कोल्हापूर, दि. 7 (जि.मा.का.)
: राधानगरी धरणाच्या 4 स्वयंचलित दरवाज्यामधून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग
सुरु आहे.
पंचगंगा नदीची
राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सायंकाळी 5 वाजता 37 फूट 1 इंच असून
जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.36
टीएमसी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व
शिंगणापूर हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी
कोगे, खडक कोगे व शिरगाव हे 5 बंधारे पाण्याखाली आहेत. तुळशी नदीवरील
बीड व आरे व बाचणी हे 3 बंधारे पाण्याखाली आहे. कुंभी नदीवरील कातळी,
सांगशी, शेणवडे, कळे, मांडुकली व वतवडे हे 6 बंधारे पाण्याखाली आहेत. कासारी
नदीवरील यवलुज, ठाणे -आवळे, पुनाळ- तिरपण, वालोली, बाजारभोगाव व करंजफेण हे
6 बंधारे पाण्याखाली आहेत. धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे 2 बंधारे
पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव, दानोळी, मांगले सावर्डे,
कोडोली, चावरे, तांदूळवाडी, शिरगाव व खोची हे 9 बंधारे पाण्याखाली आहे. दुधगंगा
नदीवरील दत्तवाड, सिंध्दनेर्ली, सुळकुड, बाचणी, सुळंबी, तुरंबे व वाळवा हे 7
बंधारे पाण्याखाली आहेत. वेदगंगा नदीवरील गारगोटी, म्हसवे, निळपण,
वाघापूर, शेळोली, कुरणी, बस्तवडे व सुरुपली हे 8 बंधारे पाण्याखाली
आहेत.
जिल्ह्यातील धरणांमधून क्युसेकमधील
होणारा विसर्ग पुढीलप्रमाणे - वारणा- 14851, तुळसी- 1521, कुंभी-1550,
कासारी-950, दूधगंगा-13200आणि कोयना-54380 क्युसेक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.