कोल्हापूर, दि. 9 (जि.मा.का.)
: राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाज्यामधून 4256, कोयनेतून 45267 तर अलमट्टीमधून
250000 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी 11 वाजता राजाराम बंधारा येथील
पंचगंगेची पातळी 39 फूट 10 इंच होती. जिल्ह्यातील 68 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणात
आज अखेर 8.29 टीएमसी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर,
राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, व शिरोळ हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील तारळे, राशिवडे, हळदी, सरकारी
कोगे व खडक कोगे हे 5 बंधारे
पाण्याखाली आहेत. तुळशी नदीवरील
बीड, आरे व बाचणी हे 3 बंधारे
पाण्याखाली आहे. कासारी नदीवरील
करंजफेण, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ- तिरपण, ठाणे -आवळे व यवलुज हे 6
बंधारे पाण्याखाली आहेत. कुंभी नदीवरील
शेणवडे, कळे (खा), वेतवडे, मांडुकली व असळज हे 5 बंधारे पाण्याखाली आहेत. धामणी
नदीवरील सुळे,आंबर्डे, म्हासूर्ली व गवसी हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा
नदीवरील चिंचोली, माणगांव, कोडोली, चावरे, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, शिगाव,
खोची व दानोळी हे 9 बंधारे पाण्याखाली आहे. कडवी
नदीवरील सवते सावर्डे, शिरगाव, कोपार्डे व बाचणी हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिंध्दनेर्ली,
सुळकुड, बाचणी, कसबा वाळवे, तुरंबे आणि सुळंबी हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. वेदगंगा नदीवरील कुरणी, सुरुपली बस्तवडे, गारगोटी,
म्हसवे, निळपण, शेळोशी आणि वाघापूर हे 8
बंधारे, हिरण्यकेशी नदीवरील खंदाळ, ऐनापूर, गिजवणे व निलजी
हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. घटप्रभा
नदीवरील तारेवाडी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे आणि आडकुर हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. ताम्रपर्णी
नदीवरील कुर्तनवाडी व हल्लारवाडी हे 2
बंधारे पाण्याखाली आहेत. असे एकूण 68 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नजिकच्या
अलमट्टी धरणात 99.17 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 103. 08
टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये
पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.40 टीएमसी, वारणा 34.05 टीएमसी, दूधगंगा
24.79 टीएमसी, कासारी 2.70 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.59 टीएमसी, पाटगाव
3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी,
घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा
आहे. धरणांमधून क्युसेकमधील होणारा विसर्ग पुढीलप्रमाणे तुळशी- 1011, कुंभी - 950,
कासारी- 1100, वारणा-11894, दुधगंगा-5400
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.