बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना शासनाची पत हमी - व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील



कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांनाही शासन पत हमी देणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी दिली.
       बँकामार्फत शेतीपूरक व्यवसायांकरिता कर्ज देताना अडचणी निर्माण केल्या जात होत्या. CGTMSE अंतर्गत शेतीपूरक व्यवसायासाठीच्या कर्जाला पत हमी देता येत नाही. यास CGFMU अंतर्गत अशा कर्जाला पत हमी देता येते. शेती पूरक व्यवसायासाठी देखील केंद्र सरकार मार्फत मुद्रा योजनेच्या धर्तीवर CGTMSE  व CGFMU या दोन्ही पत हमीच्या योजना यापुढे महामंडळाच्या कर्जासाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळामार्फत CGTMSE  व CGFMU या दोन्हीही पत हमीच्या योजनांचे शुल्क बँकेत भरल्यावर त्याचा परतावा करणार असून अशा रितीने पत हमी देण्यात येणार आहे. यासाठी शासनामार्फत दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी पत्र निर्गमित करण्यात आले आहे.
           महामंडळामार्फत आतापर्यंत 7866 जणांना योजनेचा लाभ झाला असून बँकामार्फत 400 कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. या अनुषंगाने महामंडळाकडून 3700 लाभार्थ्यांना 10 कोटीचा व्याज परतावा केला असून उर्वरित लाभार्थ्यांना व्याज परतावा देण्याचे काम सुरू आहे.
           राज्यातील मराठा प्रवर्गातील अधिकाधिक तरुणांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.