कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : इतर मागासवर्गीय वित्त
आणि विकास महामंडळामार्फत कर्ज वितरीत केलेल्या लाभार्थ्यांनी एकरक्कमी कर्ज
परतफेड केल्यास त्यांना थकीत व्याजात 2 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती इतर
मागासवर्गीय आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हनमंत बिरादार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय
वित्त आणि विकास महामंडळामार्फत यापुर्वी वितरीत केलेल्या कर्ज प्रकरणामधील
एकरक्कमी कर्ज परतफेड केल्यास व्याजदरामध्ये सवलत देण्याची आकर्षक योजना
कार्यान्वित केली आहे. या योजनेतंर्गत लाभार्थीने संपूर्ण कर्जाची एकरकमी परतफेड
करण्याची तयारी दर्शविल्यास थकीत असलेल्या व्याजात 2 टक्के सवलत देण्यात येत आहे.
याचा लाभ संबंधित लाभार्थींनी घेऊन कर्ज खाते बंद करावे, असे आवाहनही महामंडळाचे
जिल्हा व्यवस्थापक श्री. बिरादार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर
मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवन (दूरध्वनी क्रं. 0231-2653512) येथे संपर्क साधावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.