सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

राज्य पातळीवरील पीक स्पर्धेत जिल्ह्यातील तीन शेतकरी विजेते




            कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेत जिल्ह्यातील तीन शेतकरी विजेते ठरले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
          सन 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत प्रस्ताव सादर केलेल्या शेतकऱ्यांपैकी तीन शेतकऱ्यांना शासनाने विविध पुरस्काराने गौरविले आहे. त्यापैकी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार- कुंडलिक विष्णू पाटील, रा. चाफेडी, ता. करवीर. वसंतराव नाईक कृषीभूषण शेतकरी पुरस्कार- सुरेश नाभीराज मगदूम, रा. कसबा सांगाव, ता. कागल. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार- मोहन ज्ञानदेव पाटील,रा. बसरेवाडी,ता. भुदरगड.
          जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत दर वर्षी तालुका पातळी, जिल्हा पातळी पीक स्पर्धा घेण्यात येते. त्यात विजेते असलेले शेतकरीच राज्यपातळीवर पीक स्पर्धेसाठी पात्र ठरतात. सन 2017-18 मधील राज्यपातळीवरील भात पीक स्पर्धेत विजेते शेतकरी प्रथम क्रमांक- धोंडीराम खानगोंडा पार्वते, रा. सुळकूड ता. कागल. व्दितीय क्रमांक- अशोक गणपती देसाई, रा. शेळोली ता. भुदरगड. तृतीय क्रमांक कृष्णात महादेव जरग, रा. म्हसवे ता. भुदरगड.
        सन 2018-19 मधील राज्यपातळीवर भात पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी प्रथम क्रमांक- साताप्पा यशवंत पाटील,रा. येळवडे ता. राधानगरी व तृतीय क्रमांक मलगोंडा सातगोंडा टेळे,रा. सुळकूड ता. कागल.
          सन 2017-18 मधील राज्यपातळीवरील सोयाबीन पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी- प्रथम क्रमांक-संतोष बापूसो शेळके, रा.आळते ता. हातकणंगले. व्दितीय क्रमांक- प्रमोद कल्लाप्पा चौगले, रा. गडमुडशिंगी ता. करवीर. तृतीय अधिकारी मधुकर आण्णाप्पा तेलवेकर, रा. पिपळगाव खुर्द ता. कागल.
          सन 2018-19 मधील राज्य पातळीवरील सोयाबीन पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी प्रथम क्रमांक- बाळगोंडा बाबगोंडा पाटील, रा.किणी ता. हातकणंगले. व्दितीय क्रमांक-रवींद्र वसंत पाटील, रा. पाडळी ता. हातकणंगले. तृतीय क्रमांक- क्रांतीसिंह संपतराव पवार पाटील, रा. बाचणी ता. करवीर.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.