शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

म्हाडाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिला पूरग्रस्तांसाठी 1 लाख 51 हजाराचा निधी



कोल्हापूर, दि. 20 (जि.मा.का.) : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने 1 लाख 51 हजार रूपयांचा धनादेश जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी आज सुपूर्द केला.
जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे म्हाडाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूरग्रस्त निधीसाठी हा निधी देण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे म्हाडाचे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी  संजय नाईक, कोल्हापूर म्हाडाचे उपअभियंता ए.डी. पाटील, दिनेश रेडकर, श्री. सातवेकर,शिवाजी गायकवाड  व अन्य अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.