माहे सप्टेंबर 2019 चे धान्य वाटप परिमाण
कोल्हापूर, दि. 17 : जिल्ह्यातील शहरी भाग आणि तालुक्यांसाठी सप्टेंबर 2019 करिता अंत्योदय योजनेंतर्गत प्रती कार्ड 23 किलो गहू प्रति किलो 2 रुपये दराने आणि प्रती कार्ड 12 किलो तांदूळ प्रति किलो 3 रुपये दराने वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील अंत्योदय कार्ड धारकांची संख्या 53,151 आहे. तालुकानिहाय नियतनाची आकडेवारी क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोल्हापूर शहरातील गहू 560, तांदूळ 371, करवीर गहू 313, तांदूळ 163, पन्हाळा गहू 825, तांदूळ 430, हातकणंगले
गहू 1148, तांदूळ 599, इचलकरंजी गहू 1105, तांदूळ 577, शिरोळ गहू 1067, तांदूळ 557, कागल गहू 941, तांदूळ 550, शाहुवाडी गहू 450, तांदूळ 388, गगनबावडा गहू 203, तांदूळ 106, राधानगरी गहू 759, तांदूळ 516, गडहिंग्लज गहू 1327, तांदूळ 785, आजरा गहू 700, तांदूळ 433, चंदगड गहू 1382, तांदूळ 721, भुदरगड गहू 640, तांदुळ 334.
जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत लाभार्थीला प्रती कार्ड 3 किलो गहू प्रति किलो 2 रुपये दराने आणि प्रती कार्ड 2 किलो तांदूळ प्रति किलो 3 रुपये दराने वितरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची संख्या 22,66130 आहे. तालुकानिहाय नियतनाची आकडेवारी क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोल्हापूर शहरातील गहू 7260, तांदूळ 4850, करवीर
गहू 8593, तांदूळ 6000, पन्हाळा गहू 5143, तांदूळ 3431, हातकणंगले
गहू 8707, तांदूळ 5804, इचलकरंजी गहू 3875, तांदूळ 2584, शिरोळ गहू 7360, तांदूळ 4907, कागल गहू 4936, तांदूळ 3300, शाहुवाडी गहू 3800, तांदूळ 2500, गगनबावडा गहू 539, तांदूळ 359, राधानगरी गहू 3922, तांदूळ 2574, गडहिंग्लज गहू 3394, तांदूळ 2263, आजरा गहू 2006, तांदूळ 1278, चंदगड गहू 2895, तांदूळ 1930, भुदरगड गहू 3030, तांदुळ 2020.
00000
खादी
व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशी पालन योजना
कोल्हापूर
- 17 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र (मधमाशी
पालन) योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण
व महिलांनी या रोजगाराकडे वळावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले.
मध उद्योग हा केवळ शेतीपूरक व्यवसाय व जोड
धंदा म्हणून न करता एक मुख्य उद्योग म्हणून करावा, त्यातून ग्रामीण भागामध्ये रोजगार
निर्मितीला चालना मिळून शेती पिकांचे व फळबागांचे परागीभवन होऊन त्यांच्या शेती उत्पादनात
वाढ होऊन मध उद्योगातंर्गत मध, मेण आदीचे उत्पादन मिळू शकते. उत्पादित झालेला मध व
मेण मंडळाकडून शासकीय हमी दराने खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी मधपालन करणारे उद्योजक व नव्याने मधमाशापालन
उद्योग करणाऱ्यांकडून व्यक्ती व संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
मधपाळसाठी पात्रता - अर्जदाराचे वय 18 वर्षे
पूर्ण असावे व तो साक्षर असावा. केंद्र संचालकसाठी
पात्रता - अर्जदाराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे,
अर्जदाराकडे किंवा त्याच्या कुटुंबाकडे 1 एकर शेती असणे आवश्यक आहे. मधमाशी पालन करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना मधमाशी
पालनचे प्रशिक्षण देण्याची क्षमता त्याच्या अंगी असणे आवश्यक आहे. केंद्र चालक संस्थांसाठी पात्रता- संस्था ही नोंदणीकृत
असावी. संस्थेकडे मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देण्याची क्षमता असणारे कुशल सेवक असावेत.
संस्थेच्या नावे अथवा भाड्याने किमान 10 वर्षे मुदतीने घेतलेली 1 एकर शेती असावी. तसेच
संस्थांकडे किमान 1 हजार चौरस फुट क्षेत्राची सुसज्ज अशी इमारत असावी. छंद प्रशिक्षण-
शाळा, कॉलेज विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ नागरिक व शेतकरी यांना 5
दिवसाचे प्रशिक्षण नोंदणी शुल्क प्रती लाभार्थी रुपये 25 असणार आहे.
मधमाशापालन योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना
50 टक्के स्वगुंतवणूक किंवा बँकेचे कर्ज व 50 टक्के अनुदान हे मधपट्टया व मध उद्योग इतर साहित्याच्या स्वरुपात
वाटप करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकरी, मधपाळ व जंगल परिसरातील
मध उद्योग करणारे उद्योजक यांनी याचा लाभा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून अधिक
माहितीसाठी 0231-2651271 या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा.
00000
राधानगरी
अभयारण्य सभोवताल
पर्यावरण
संवेदनशील क्षेत्र निर्मितीबाबत हरकती पाठवा
कोल्हापूर
- 17 (जिमाका) : राधानगरी अभयारण्याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडून
अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबबात हरकती आणि सूचना esz-mef@nic.in या ई-मेलवर
पाठवाव्यात असे आवाहन केले आहे.
राधानगरी वन्यजीव अभायरण्याच्या संरक्षणासाठी
351.16 वर्ग किलोमीटर परिसर वन्यजीवांसाठी घोषित करण्यात आले आहे. तसेच अभायरण्याची
सीमा 0.0324 ते 6.01 किमी पर्यंत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील
13 गावांचा समावेश आहे. यामध्ये कुंडलगाव, मानबेट, राय, पडसाली, ताळगाव, दुर्गामनवाड,
पिराळ, शिरोळी, बुजावाडे, हेळेवाडी, पनोरी, फराले व ऐनी यांचा समावेश आहे. गगनबावडा
तालुक्यामधील 4 गावांचा समावेश यामध्ये तळीये केडी, बोरबेट, गरिवाडे व बवेली या गावांचा
समावेश आहे. भुदरगड तालुक्यामधील 8 गावांचा समावेश यामध्ये फाये, खेदाडे, येरानदापे,
बसनोली, कोडोंशी, तमबाले, अंतुरली व शिवदेवी या गावांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील
3 गावांचा समावेश यामध्ये दुर्गानगर, येवतेश्वर व जांभळगाव यांचा समावेश आहे. कणकवली
व वैभववाडी तालुक्यामधील 12 गावांचा समावेश असून यामध्ये कणकवलीतील नरडवे, रंजनगाव,
नाटळ, कुंभवडे, भिरवंडे, रामेश्वरनगर, गांधीनगर, हरकुळ केडी, फोंडा व घोणसरी तर वैभववाडीतील कुर्ली व शिराळे या गावांचा
समावेश आहे. अशा कोल्हापूर जिल्ह्यातील 25 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 गावांचा संवेदनशील
क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. असे उप वनसंरक्षक विभाग कोल्हापूर यांनी कळविले
आहे.
00000
लाभार्थ्यांनी
कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास
व्याजदरात
2 टक्के सवलत
कोल्हापूर
- 17 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय
वित्त आणि विकास महामंडळामार्फत यापूर्वी वितरीत केलेल्या कर्ज प्रकरणातील लाभार्थ्यांसाठी
एक रकमी कर्ज परतफेड केल्यास व्याजदरामध्ये सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात
आली आहे, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक हनमंत बिरादार यांनी केली.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांने संपूर्ण कर्जाची
एकरकमी परतफेड करण्याची तयारी दर्शविल्यास थकीत असलेल्या व्याजात 2 टक्के सवलत देण्यात
येणार आहे. याचा लाभा सर्व संबंधित लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, विचारे माळ, कोल्हापूर दूरध्वनी क्र.
0231-2653512 या क्रमांकावर संपर्क साधावा.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.