कोल्हापूर, दि.
5 (जि.मा.का.) : ग्रामीण भागातील 54 हजार 976 आणि शहरी भागातील 23 हजार 679 कुटुंबांना
रोख 5 हजार रुपये प्रमाणे आज अखेर 39 कोटी 32 लाख 75 हजार रुपयांचे तसेच ग्रामीण भागातील
9263 आणि शहरी भागातील 86 कुटुंबांना 4 कोटी 71 लाख 75 हजार धनादेशाद्वारे बँक खात्यात
सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. तसेच एकूण
74 हजार 693 कुटुंबांना 10 किलो गहू आणि तांदुळ असे 746.93 मेट्रीक टन वाटप करण्यात
आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
सानुग्रह
अनुदान वाटप करण्यात आलेली तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे - करवीर ग्रामीण 9 हजार
621 शहरी 9 हजार 277 कुटुंबांना 9 कोटी 44 लाख 90 हजार, कागल ग्रामीण
1 हजार 776 कुटुंब शहरी भागात 61 कुटुंब 91 लाख 85 हजार रोखीने तसेच 1 हजार 512 ग्रामीण
कुटुंबांना 75 लाख 60 हजार रुपये धनादेशाद्वारे बँक खात्यात जमा. पन्हाळा ग्रामीण 968 कुटुंब 48 लाख 40 हजार रोखीने तसेच 968 ग्रामीण
कुटुंबांना 48 लाख 40 हजार धनादेशाद्वारे बँकेत जमा. शाहुवाडी ग्रामीण 399 शहरी 53 कुटुंब 22 लाख 60 हजार
रोखीने तसेच 25 लाख 25 हजार धनादेशाद्वारे बँकेत जमा. हातकणंगले ग्रामीण 9 हजार 450 शहरी 7 हजार
460 कुटुंबांना 8 कोटी 45 लाख 50 हजार, शिरोळ ग्रामीण 29 हजार 715
शहरी 6 हजार 539 कुटुंबांना 18 कोटी 12 लाख 70 हजार रोखीने तसेच 4 हजार 731
ग्रामीण कुटुंबांना 2 कोटी 36 लाख 55 हजार धनादेशाद्वारे बँकेत जमा. राधानगरी ग्रामीण 747 कुटुंब 37 लाख 35 हजार रोखीने
तसेच 766 ग्रामीण कुटुंबांना 33 लाख 5 हजार धनादेशाद्वारे बँकेत जमा. भुदरगड ग्रामीण
147 कुटुंब 7 लाख 35 हजार रोखीने तसेच 7 लाख 35 धनादेशाद्वारे बँकेत जमा. गगनबावडा
ग्रामीण 105 कुटुंब संख्या 5 लाख 25 हजार रोखीने तसेच 5 लाख 25 हजार धनादेशाद्वारे
बँकेत जमा. गडहिंग्लज ग्रामीण 1 हजार 300 शहरी
255 कुटुंबांना 77 लाख 75 हजार, आजरा ग्रामीण 38 व शहरातील 8 कुटुंब 2 लाख 30
हजार रोखीने तसेच 2 लाख 70 हजार धनादेशाद्वारे बँकेत जमा. चंदगड ग्रामीण 710 कुटुंब
आणि 26 शहरी कुटुंबांना 36 लाख 80 हजार रोखीने तसेच 702 ग्रामीण आणि 25 शहरी कुटुंबांना
37 लाख 60 हजार धनादेशाद्वारे बँकेत जमा असे एकूण 44कोटी 4 लाख 50 हजार
रुपयांचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील 386 बाधित गावांमधील 1 लाख
3 हजार 26 कुटुंबांमध्ये 4 लाख 9 हजार 589 व्यक्तींचे स्थानांतर करण्यात आले होते.
418 गायी, 24 मशी, 127 वासरे, 231 शेळ्या, 25 मेंढी आणि 62131 कोंबड्या पूरामध्ये मृत
झाले आहेत. पूर्णत: पडलेली घरे -7820, अंशत: पडलेली घरे-31692, पडझड झालेल्या झोपड्या
206 आणि 3569 गोठ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात
314 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
अतिवृष्टीमुळे मयत झालेल्या 13 व्यक्तींनी
पैकी 8 जणांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख प्रमाणे 32 लाख रुपयांची मदत वाटप करण्यात
आली असून उर्वरित वारसांनाही लवकरच मदत देण्यात येणार आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.