कोल्हापूर, दि. 11 (जि.मा.का.)
: तपासावरील प्रलंबित प्रकरणे पोलीसांनी तात्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी दिल्या.
जिल्हा
दक्षता व नियंत्रण समितीची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला समाज
कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील,
सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता नसरीन मणेर, समाज कल्याण निरीक्षक के.आर. पांडव, संजय
पवार, अशासकीय सदस्य राजू मालेकर, एस.सी.सरनोबत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस.आर.
हंकारे, सहायक संचालक नसरीन मगरे, निमंत्रित एन.बी.आयरेकर आदी उपस्थित होते.
सहायक आयुक्त श्री. कामत यांनी सर्वांचे स्वागत
करुन विषय वाचन केले. त्यानंतर त्यांनी सविस्तर आढावा सांगितला. यामध्ये अनुसूचित जाती,
जमाती (अत्याचार प्रतिबंध 1989) ॲट्रॉसिटी अंतर्गत व नागरी हक्क संरक्षण अंतर्गत घडलेल्या
गुन्ह्यांच्या सद्यस्थितीबाबत समावेश होता. जानेवारीमध्ये 10, फेब्रुवारीमध्ये 3, मार्चमध्ये
9, एप्रिलमध्ये 2, मेमध्ये 10, जूनमध्ये
5, जुलैमध्ये 3 व ऑगस्टमध्ये 10 असे एकूण 52 गुन्हे घडलेले आहेत. यामधील तपासावरील 30 प्रकरणे प्रलंबित आहेत.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी या प्रलंबित
प्रकरणांचा आढावा घेतला. ते म्हणाले, उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे वगळता प्रलंबित
असणारी सर्व प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावावी. दोषारोप पत्र पाठवावे जेणेकरुन पीडितांना
अर्थसहाय्य देता येईल. पोलीसांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी समाज कल्याण विभागाने
सहकार्य करावे. पिडीतांना अर्थसहाय्य देण्याबाबतही कार्यवाही व्हावी, असेही ते म्हणाले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.