सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी शहरातील वाहतुकीचे नियमन



कोल्हापूर, दि. 9 (जि. मा. का.) : गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी शहरामध्ये होणाऱ्या नागरिकांची, भाविकांची व मोटर वाहनांची गर्दी यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये, नागरिक, पादचारी व भाविक यांची सुरक्षितता जोपासता यावी यासाठी शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यात येत आहे.
       वसंत मेडीकल (भवानी मंडप) येथून शिवाजी पुतळ्याकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना सोळंकी कोल्ड्रींक हाऊस या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे. संबंधित वाहनांनी जेलरोड मार्गानी बिंदू चौक या एक दिशा मार्गाचा वापर करावा. बिनखांबी गणेश मंदिराकडून निवृत्ती चौकाकडे जाणाऱ्या सर्व मोटार वाहनांना बिनखांबी गणेश मंदिर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहेत. गांधी मैदान कडून खरी कॉर्नरला जाणाऱ्या सर्व मोटार वाहनांना गांधी मैदान मेन गेट येथे प्रवेश बंद करण्यात येत असून महाराष्‍ट्र हायस्कूल मार्गे पुढे मार्गस्थ हेातील. मिरजकर तिकटी व गांधी मैदानकडून खरी कॉर्नर मार्गे लाड चौकाकडे जाणाऱ्या चारचाकी मोटार वाहनांना खरी कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने गांधी मैदान मार्गे पुढे मार्गस्थ हेातील.
          तटाकडील तालीम,सरस्वती टॉकीज,उभा मारूती चौकाकडून निवृत्ती चौकाकडे येणारी सर्व वाहने बिनखांबी गणेश मंदिर किंवा गांधी मैदान मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील. गांधी मैदान ते निवृत्ती चौक ते बिनखांबी गणेश मंदिरकडे जाणाऱ्या वाहनांना थांबण्यास मनाई करण्यात येत आहे. भोगावती,राधानगरी (कळंबा नाका,नवीन वाशीनाका) मार्गे येणारी व जाणारी सर्व अवजड वाहने नवीन वाशी नाका ते साई मंदिर, कळंबा ते इंदिरा सागर हॉल चौक ते रिंगरोड मार्गे ते सायबर चौक ते हायवे कँटीन चौक ते रेल्वे उड्डाण पुल ते ताराराणी पुतळा मार्गे पुढे तावडे हॉटेलकडे मार्गस्थ होतील.
          कोकणातून गगनबावडा मार्गे येणारी व जाणारी सर्व अवजड वाहने फुलेवाडी नाका ते फुलेवाडी रिंगरोड ते आपटेनगर चौक ते नवीन वाशी नाका ते साई मंदिर कळंबा ते इंदिरा सागर हॉल चौक ते रिंगरोड मार्गे ते सायबर चौक ते हायवे कँटीन चौक ते रेल्वे उड्डाण पुल ते ताराराणी पुतळा मार्गे पुढे तावडे हॉटेलकडे मार्गस्थ होतील. इंदिरा सागर हॉलकडून नंगीवली चौकातून मिरजकर तिकटीकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने नंगीवली चौक येथून हिंद तरूण मंडळ ते स.म. लोहिया हायस्कूल ते खरी कॉर्नर ते बिनखांबी गणेश मंदिर चौक या मार्गे मार्गस्थ होतील. तांबट कमान स.म. लोहिया हायस्कूलकडून हिंद तरूण मंडळ येथून नंगीवली चौकाकडे  जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मोटर वाहनांना हिंद तरूण मंडळ येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
          कोल्हापूर शहरातून रत्नागिरी -पन्हाळाकडे जाणारी व येणारी सर्व अवजड मोटर वाहने रात्री 8 नंतर ताराराणी चौक (धैर्यप्रसाद हॉल) आदित्य कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते सीपीआर चौक ते शिवाजी पुल मार्गे ये-जा करतील. त्यांना  4 वाजण्यापूर्वी शहरात येण्यास मनाई आहे. भोगावती येथून येणाऱ्या आणि रंकाळा स्टँडकडे जाणाऱ्या एसटी बसेस क्रशर चौक,राजकपूर पुतळा,जावळाचा गणपती येथून उजवीकडे वळण घेऊन रंकाळा स्टँडकडे मार्गस्थ होतील. रंकाळा स्टँड येथून भोगावती आणि गगनबावड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेब तटाकडील तालीम ताराबाई रोडमार्गे सोईनुसार रंकाळा टॉवर किंवा क्रशर चौक मार्गे मार्गस्थ होतील. रंकाळा एसटी बस स्टँड येथून सीबीएसकडे ये-जा करणाऱ्या एसटी बसेस रंकाळा स्टँड ते गंगावेश ते पंचगंगा तालीम ते शिवाजी पुल ते तोरस्कर चौक ते सीपीआर मार्गे सीबीएसकडे ये-जा करतील.
          शिये फाटा येथून कसबा बावडा मार्गे शहरात रात्री 8 वाजता येणारी सर्व प्रकारची जड,अवजड वाहने उत्सव काळात या मार्गाने न  येता शिये फाटा येथून राष्ट्रिय महामार्गावरून पुढे जाऊन तावडे हॉटेल ते शिरेाली टोल नाका  ते ताराराणी पुतळा मार्गे शहरात येतील. कोल्हापूर शहरातून कसबा बावडा शिये फाटा मार्गे राष्ट्रिय महामार्गावर जाणारी वाहने ताराराणी पुतळा ते शिरोली टोल नाका ते तावडे हॉटेल मार्गे शहराबाहेर जातील. व्हीनस कॉर्नर ते आईसाहेब पुतळा जाण्यासाठी व्हीनस चौक ते नाईक अँड नाईक कंपनी ते फोर्ड कॉर्नर हा मार्ग एकेरी करण्यात येत आहे. या मार्गावर विरूध्द दिशेने येण्यास मनाई करण्यात येते. संबंधित वाहनांना फोर्ड कॉर्नर ते कोंडा ओळ ते व्हीनस कॉर्नर हा मार्ग उपलब्ध करून देण्यात येत आहे.
          शुक्रवार पेठ पोलीस चौकीकडून वाघाची  तालीमकडे जाणारी वाहतुक एकेरी करण्यात येत आहे. दुधाळी पॅव्हेलियनकडून वाघाची तालीम मार्गे शुक्रवार पेठ पोलीस चौकीकडे येणाऱ्या वाहतुकीस वाघाची तालीम या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत असून ती वाहतूक वाघाची तालीम या ठिकाणाहून डावीकडे किंवा उजवीकडे वळण घेऊन पुढे मार्गस्थ हेातील. शाहूपुरी गल्ली नंबर 2 येथील वाहतूक एकेरी करण्यात आली असून मास्टर विनायक चौक ते मुळे विहीर अशी जाईल. राजारामपुरी 11 वी गल्ली अग्नेयमुखी मारूती मंदिर ते जनता बाजारकडे येणाऱ्या राजारामपुरी मेन रोडवरील वाहतूक दोन्ही बाजूस पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. आईचा पुतळा चौकाकडून कमला चौकाकडे जाणारा बस मार्ग हा एकेरी मार्ग आहे. या मार्गावर आईचा पुतळा या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.संबंधितांनी शाळा नं. 9 समोरील कांबळे चौक ते शाहू मिल पोलीस चौकी या मार्गाचा वापर करावा.
          आवश्यतेनुसार केएमटी बसेसची वाहतूक वळवण्यात येईल. वरील सर्व मार्ग हे आजपासून ते 11 सप्टेबरपर्यंत दररोज सायंकाळी 4 वाजलेपासून ते रात्री गर्दी संपेपर्यंत सर्व वाहनांना बंद व खुले करण्यात येत आहेत. संबंधित वाहनधारकाने  आपले वाहन दिलेल्या पार्कींग सुविधेत लावावे. वाहन रहदारीच्या रस्त्यावर डबलपार्क होणार नाही व रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.