शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

शासकीय आयटीआय कळंबा ऑनलाईन प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ



       कोल्हापूर, दि. ६ (जिमाका) : शासकीय आयटीआय कळंबा येथे प्रवेश सत्र २०१९ साठी एकूण ३० व्यवसायांकरिता ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. या प्रवेश फेरीकरिता रिक्त राहिलेल्या जांगासाठी अर्ज सादर व अर्ज निश्चित करण्यासाठी दिनांक ११
 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे. 
      प्रवेश अर्ज ऑनलाईन http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावेत.  प्रवेश अर्ज ऑन लाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट जवळच्या शासकीय आयटीआय मध्ये सादर करावी. विहीत शुल्क भरुन प्रवेश अर्ज निश्चित करावा.  संस्थेत ४५० प्रशिक्षणार्थ्यांची राहण्यासाठी वसतिगृहात सोय असून शासकीय नियमाप्रमाणे एसटी, बस पास व रेल्वे पास सवलत देण्यात येणार आहे.
नव्याने अर्ज केलेल्या व अप्रवेशित सर्व उमेदवारांची राज्यसतरीय एकत्रित गुणवत्ता यादी प्रवेश संकेतसतळावर दिनांक १२ सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नव्याने अर्ज केलेल्या व यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु न मिळालेले अशा सर्व उमेदवारांनी संबंधित शासकीय औ. प्र. संस्थेत नावनोंदणी करणे व नोंदणीकृत उमेदवारांची संस्था स्तरावर गुणवत्ता यादी १३ सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नोंदणीकृत उमेदवारांना संस्थास्तरावर प्रवेशासाठी जागा बहाल करुन (Allotment) त्याच दिवशी प्रवेशाची कार्यवाही दिनांक १४ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.  
00 0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.