कोल्हापूर, दि. 6
(जि. मा. का.) : धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राधानगरी धरणाच्या 4
स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहातून 7 हजार 112 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे
पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये,असे
आवाहन पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले
आहे.
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या 3 दिवसात पाऊस
झाल्याने पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील
पाणी पातळीत गेल्या 3 दिवसात 13 फूटांनी वाढ होऊन आज ती 33 फूट इतकी आहे.
सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. तुळशीतून
1 हजार 11, कुंभीतून 1 हजार 850, कासारीमधून 1 हजार 250 असा पंचगंगा नदीतून 11 हजार 223 एवढा विसर्ग सुरू
आहे. त्याचबरोबर राजाराम बंधाऱ्यातून 33 हजार 332 क्युसेक एवढा विसर्ग चालू आहे.
म्हणजेच मुक्त पाणलोट क्षेत्रातून 22 हजार 109 क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा
नदीच्या पाणी पातळीत कमी होण्याची शक्यता असल्याने कोणतीही गंभीर परिस्थिती
उद्भवणार नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. नदी काठावरील नागरिकांनी सतर्क
रहावे, असे आवाहन श्री. बांदिवडेकर यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.