बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

दिव्यांग व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजावावा ---जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई कोल्हापूर


दिव्यांग व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजावावा
                   ---जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर - 18 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने यावर्षी ‘सुलभ निवडणूका’ हे घोषवाक्य जाहिर केले आहे. यामध्ये दिव्यांग मतदारांना सोईसुविधा देणे, दिव्यांग मतदारांची मतदार नोंदणीमध्ये वाढ करणे. यासाठी जिल्ह्यातील दिव्यांगाच्या सुलभ निवडणूकीच्या कामकाजासाठी जिल्हा समन्वयक म्हणून जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
अतितीव्र दिव्यांग व्यक्ती, बेड रिडन दिव्यांग व्यक्ती, ज्या वयक्तींना मुक्त संचार करता येत नाही, अशा व्यक्तींना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत परत मतदान केंद्र ते घरापर्यंत अशी मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दिव्यांग व्यक्तींनी मतदानादिवशी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात येत आहे.
0000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.