सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

शिरोळमधील 4 गावातून 112 तर करवीर मधील दोन गावातून 259 कुटुंबांचे स्थलांतर


शिरोळमधील 4 गावातून 112 तर करवीर मधील दोन गावातून 259 कुटुंबांचे स्थलांतर
            कोल्हापूर, दि. 9 (जि.मा.का.) : खबरदारीचा उपाय म्हणून आज अखेर शिरोळमधील चार गावातील 112 कुटुंबातील 460 व्यक्तींचे तर करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीमधील 250 कुटुंबातील 390 आणि कोल्हापूर शहरातील 9 कुटुंबातील 28 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
            शिरोळ तालुक्यातील गोठणपूर (कुरुंदवाड) मधील 19, राजापूरमधील 48, राजापूरवाडीमधील 18 व खिद्रापूरमधील 27 अशा 4 गावातून 112 कुटुंबातील 460 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 146 पुरुष, 175 स्त्रीया आणि 139 लहान मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबरच 135 जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. 
            करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावातील 250 कुटुंबातील 390 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 90 पुरुष, 300 स्त्रीया यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गावातील 450 जनावरांचेही स्थलांतर झाले आहे. कोल्हापूर शहरातील 9 कुटुंबातील 28 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 15 पुरुष, 13 स्त्रीया यांचा समावेश आहे. अशा एकूण 371 कुटुंबातील 878 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.
000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.