गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

राधानगरी, मुरगूड तालुक्यात 28 व 30 सप्टेंबरला वाहनांसाठी शिबीर/ माजी सैनिकांचा ऑक्टोबर कल्याण संघटक दौरा रद्द / रत्नागिरी येथे 17 ते 27 नोव्हेंबर सैन्य भरती मेळावा


राधानगरी, मुरगूड तालुक्यात
28 व 30 सप्टेंबरला वाहनांसाठी शिबीर
कोल्हापूर - 26 (जिमाका) : जिल्ह्यामधील विविध ठिकाणी लायसन्स व इतर कामकाजासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात येते. माहे सप्टेंबर महिन्यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या अभावी राधानगरी व मुरगूड या तालुक्यातील लायसन्स व इतर कामकाजबाबतचे शिबिर होऊ शकले नाही. आता ही शिबिरे राधानगरी तालुक्यासाठी शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी, तर मुरगूड तालुक्यासाठी सोमवार 30 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहेत. तरी सर्व संबंधित तालुक्यातील वाहनाधारकांनी आपल्या वाहनाच्या लायसन्सबाबत व इतर कामकामाबाबत काही समस्या असल्यास, त्यांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन पूर्तता करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस यांनी दिली.
जनतेच्या सोयीसाठी शिबिर कार्यालयात भेट घेण्यासाठी एकसूत्रता यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक व वाहनधारकांनी माहे ऑक्टोबर पासून आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कार्यालयीन वेळेत शिबिर व स्लॉट सोडण्यात येणार आहे. तरी संबंधित वाहनधारकांनी तालुक्याच्या ठिकाणी शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी ( अपॉन्टमेंट ) भेट घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
000000
माजी सैनिकांचा ऑक्टोबर कल्याण संघटक दौरा रद्द
कोल्हापूर - 26 (जिमाका) : जिल्ह्यातील माजी सैनिकांना कळविण्यात येते की, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणूकीच्या कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली असल्याने, या कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणारा माहे ऑक्टोबर 2019 रोजीचा तालुका कल्याण संघटक दौरा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी माहे ऑक्टोबरचा कल्याण संघटक दौरा रद्द करण्यात आला आहे याची नोंद जिल्ह्यातील माजी सैनिकांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
रत्नागिरी  येथे 17 ते 27 नोव्हेंबर सैन्य भरती मेळावा
कोल्हापूर - 26 (जिमाका) : 17 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत रत्नागिरी (महाराष्ट्र) येथे सैन्य भरती मेळावा घेण्यात येणार आहे. सोल्जर जनरल ड्युटी (डी.जी.),  सोल्जर  लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल,  सोल्जर टेक्निकल,  (एनए आणि व्हेट), सोल्जर ट्रेर्ड्समन आणि सोल्जर कामगार शिपाई फार्मा ( ए. एम. सी.) या जागांसाठी सैन्य भरती मेळावा होणार आहे.   हा सैन्य भरती मेळावा महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी आणि गोवा राज्यातील उत्तर गोवा व दक्षिण गोवा या जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील, अशी माहिती सैन्य भरती  संचालक कर्नल अनुराग सक्सेना यांनी दिली. 
               या भरतीसाठी उमेदवारांनी सर्व प्रथम भारतीय सेनेच्या वेबसाइट www.jonindianarmy.nic.in  वर  दिनांक 18 सप्टेंबर 2019 ते 1 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या उमेदवारांचे प्रवेश पत्र 2 नोव्हेंबर 2019 नंतर त्यांच्या ई-मेलद्वारे पाठविले जातील. उमेदवारांना विशिष्ट श्रेणीसाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रताअसणे आवश्यक आहे.
               मोठ्या संख्येने कॅडेडेट्सच्या व्यवस्थापनासाठी संपूर्ण तपशीलवार नियोजन आणि जमिनीवर निर्दोष अंमलबजावणीची आवश्यकता असते. मुख्यालय भरती विभाग, पुणे यांच्याअंतर्गत रत्नागिरी भरती मेळावा सैन्य भरती कार्यालय कोल्हापूरच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या रॅलीचे नियोजन व समन्वय जानेवारी 2019 मध्ये सुरू झाले आणि राज्य सरकार, जिल्हा प्रशासन व पोलिस मुख्यालय, रत्नागिरी यांचे भरघोस समर्थन व सहकार्य मिळाळे आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.