कोल्हापूर, (जिमाका), दि. 12 : कोल्हापूर शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नागरीकांनी
कापडी पिशव्या वापरास प्राधान्य द्यावे. कापडी पिशवीवर देण्यात
आलेल्या संदेशानुसार अंमलबजावणी व प्लास्टिक बंदीबाबत
जनजागृती करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केले.
चेतनाविकास मंदिर व टेंबलाईवाडी विद्यालय, टेंबलाईवाडी येथे महिला
आर्थिक विकास महामंडळ (माविम) व महाराष्ट्र प्रदूषण नियत्रण मंडळ यांच्या संयुक्त
विद्यमाने प्लास्टिक बंद, अंमलबजावणी व जनजागृती करण्यासाठी कापडी पिशव्यांचे विद्यार्थ्यांना श्री. कलशेट्टी यांच्याहस्ते
मोफत वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र
प्रदूषण नियत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, संजय मोरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी
बाळासाहेब झिंजाडे आदी उपस्थित होते.
श्री. कलशेष्ट्टी म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना कापडी पिशवी
वापराविषयी हट्ट धरावा व बाजारात जाताना कापडी पिशवी घेवूनच बाहेर पडावे. शहर
प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त करण्यासाठी प्लास्टिक कचरा साठवा,
शाळेत पाठवा ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत प्लास्टिक व प्लास्टिकजन्य वस्तू घरामध्ये
साठवून विद्याथ्यांमार्फत शाळेत पाठवाव्यात
असे आवाहन डॉ. कलशेट्टी यांनी केले.
जिल्हा समन्वय अधिकारी श्री. झिंजाडे
म्हणाले, महानगरपालिका व नगरपरिषदच्या माध्यमातून १४१
शालेना ३३०१० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आल्या आहेत. प्लास्टिक बंदी ही
कापडी पिशवीच्या माध्यमातून जनजागृती व अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्य होणार आहे. माविमस्थापित
स्वंयसहायता
महिला बचत गटांतील महिलांनी कापडी पिशव्या बनविल्या
असून खऱ्या अर्थाने प्लास्टिक बंदी बरोबरच महिलांना देखील रोजगार उपलब्ध झालेला
आहे.
तेजस्विनी व DAY –NULM कार्यक्रमाअंतर्गत महिलांनी या कापडी
पिशव्या बनविल्या असून या बचत गटांत गरीब, गरजू, विधवा, घटस्फोटीत
परीतक्ता, भूमिहीन, शेतमजूर मागासवर्गीय व विकासापासून वंचित महिलांचे संघटन केले
आहे. या महिलांनी अत्यंत उत्कृष्टपणे व यशस्वीपणे काम पूर्ण केले तसेच महिलांमध्ये
जाणीवजागृती करण्याचे काम माविमने हाती घेतले आहे .
कोल्हापूर महानगरपालिका व इचलकरंजी नगरपरिषद ,कुरुंदवाड
नगरपरिषद ,जयसिंगपूर नगरपरिषद, कसब वडगाव नगरपरिषद, कागल नगरपरिषद, मुरगूड नगरपरिषद,
गडहिंग्लज नगरपरिषद येथे माविम स्थापित लोकसंचलित साधन केंद्राच्या
माध्यमातून कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या आहेत.
सूत्रसंचालन माविमचे लेखाधिकारी
विनायक कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतना विकास मंदिरचे सुनील मोरे याने
मानले . कार्यक्रम
क्षेत्रीय अधिकारी श्री. हरबळ व श्री. भरडत, चेतना विकास मंदिरचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर व टेंबलाईवाडी विद्यालयचे मुख्याधापक
श्री. पिंगळे, माविमचे सहा सनियंत्रण अधिकारी उमेश लिंगनूरकर यांच्यासह
विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.