मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले 4256 क्युसेक विसर्ग



 कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. विद्युत विमोचकामधून 1400 क्युसेक व सांडव्यामधून 2856 क्युसेक असा एकूण 4256 क्युसेक विसर्ग सुरु आहे. कोयनेतून 2100 तर अलमट्टीमधून 62991 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी 19.8 फूट इंच होती. जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणात आज अखेर 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे.
   पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, व शिरोळ हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील हळदी व खडक कोगे हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.  वारणा नदीवरील चिंचोली, तांदूळवाडी व माणगांव हे 3 बंधारे पाण्याखाली आहेत. कासारी नदीवरील वालोली, पुनाळ-तिरपण, ठाणे-आवळे व यवलूज हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. दूधगंगा नदीवरील दत्तवाड हा 1 बंधारा पाण्याखाली आहे.  असे एकूण 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  नजिकच्या अलमट्टी धरणात 123.081 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 104.72  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.42 टीएमसी, वारणा 34.11  टीएमसी, दूधगंगा 25.10 टीएमसी, कासारी 2.70 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.67 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
     बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 19.8 फूट, सुर्वे 19.8 फूट, रुई 48.3 फूट, इचलकरंजी 46.3 फूट, तेरवाड 43 फूट, शिरोळ 35.6 फूट, नृसिंहवाडी 34 फूट, राजापूर 23 फूट तर नजीकच्या सांगली 11.3 फूट आणि अंकली  14.5 फूट अशी आहे.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.