कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : विधानसभा निवडणूक 2019
निवडणूक पूर्वपीठिका नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमे यांच्यासाठी
उपयुक्त व संग्राह्य ठरेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज व्यक्त
केली.
जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या
वतीने तयार केलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा माहिती
अधिकारी प्रशांत सातपुते, निवृत्त माहिती अधिकारी एस.आर.माने उपस्थित होते.
उद्यापासून नामनिर्देशनपत्र
स्वीकारण्यास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन आज
करण्यात आले, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, 1972 पासूनचे
निवडणूक निकाल या पुस्तिकेमध्ये आहेत. 2005,2009 आणि 2014 या निवडणूकांची सर्व
माहिती या पुस्तिकेमध्ये आहे. नागरिक, मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार, राजकीय
विश्लेषक,पत्रकार, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना या पुस्तिकेचा संदर्भासाठी उपयोग
होईल,असे सांगून त्यांनी संग्राह्य ठरणारी ही पुस्तिका केल्याबद्दल जिल्हा माहिती
कार्यालय आणि निवडणूक कार्यालय यांचे अभिनंदनही केले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.