कोल्हापूर, दि. 9 (जि. मा. का.) : राजकीय
पक्ष आणि उमेदवार यांच्याकडून केल्या जाणाऱ्या निवडणूक खर्चाच्या विविध बांबीचा
प्रारूप दर तक्ता यावर चर्चा करण्यासाठी आणि निवडणूक खर्चासंबधी तरतूदीची माहिती
देण्यासाठी जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील
प्रमुख राजकीय पक्ष व उमेदवार यांची बैठक बुधवारी आयोजित केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी
10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील
राजर्षी शाहू सभागृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीला प्रमुख राजकीय पक्ष व
उमेदवारी यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन
करण्यात आले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.