कोल्हापूर, दि. 9 (जि. मा. का.) : जिल्ह्यात
झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने 7 राज्यमार्ग व 17 प्रमुख जिल्हा
मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक
अभियंता संभाजी माने यांनी दिली.
चंदगड तालुक्यातील कोल्हापूर, परिते, गारगोटी, गडहिंग्जल, कोदाळी भेडसी ते राज्य हद्दमध्ये
राज्य मार्ग क्रमांक 189 या मार्गावरील तिलारी घाटामध्ये 30 मीटर लांबीत रस्ता
खचल्याने वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 5 जुलै पासून बंद असून
आजरा, अंबोली, सावंतवाडी मार्गे वाहतूक सुरु आहे.
हातकणंगले तालुक्यातील पन्हाळा, वाघबीळ,
इचलकरंजी, शिरदवाड राज्य मार्ग क्र. 192 या मार्गावरील इचलकरंजी जुना पुलावर पाणी
असल्यामुळे वाहतुक बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 5 सप्टेंबर पासून बंद
असून पंचगंगा नदीवर मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू आहे.
करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराबाहेरील
वळण रस्ता ऊजळाईवाडी रस्ता राज्य मार्ग क्रमांक 194 मार्गावर शिंगणापूर केटीवेअर
रस्त्यावर 1 फुट पाणी असल्याने 31 ऑगस्ट पासून वाहतूक बंद असून पर्यायी मार्गाने
वाहतूक सुरू आहे. कुडित्रे, कोगे, महे, देवाळे, दिंडनेर्ली, नंदगाव प्र.क्र.28 या प्रमुख
जिल्हा मार्गावर कोगे बंधाऱ्यावर 2 फूट पाणी असल्यामुळे वाहतूक बंद आहे. पर्यायी बालिंगा, दोनवडे, घानवडे
मार्गाने वाहतूक सुरु आहे. आय.टी.आय. पाचगांव खेबवडे ते बाचणी प्र.जि.मा. क्र.30
मार्गावर खेबवडे गावाजवळ 2 फूट पाणी आल्यामुळे वाहतूक बंद. पर्यायी मार्गाने
वाहतूक सुरु. शिरोली दुमाला बाचणी प्रजिमा
क्र .37 मार्गावर बाचणी बंधाऱ्यावर 3 फूट पाणी असल्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक
सुरु. येवती पाटी बाचणी प्रजिमा क्र. 42 बाचणी
बंधाऱ्यावर पाणी असल्यामुळे वाहतूक बंद आहे. पर्यायी एमडीआर 43 मार्गे वाहतूक
सुरु, बालिंगे महेपाटी, बिड पडळी कारिवडे दिगस ओळवण प्रजिमा क्र. 29 महे पुलावर 4
फुट पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.
शिरोळ
तालुक्यातील अतिग्रे, शिरढोण, मजरेवाडी, टाकळी, खिद्रापूर ते जिल्हा हद्द
रा.मा.क्र. 200 मार्गावर शिरढोण पुलावर 5 फुट पाणी तसेच मजरेवाडी ते अकिवाट
गावाजवळ पाणी असल्याने वाहतूक बंद. नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु. कबनूर
गंगानगर,नांदणी शिरोळ प्रजिमा क्र. 31 धरणगुत्ती गावाजवळ 2 फुट पाणी आल्याने
वाहतूक बंद आहे. जयसिंगपूर मार्गे पर्यायी वाहतुक सुरु आहे.
कागल तालुक्यातील निढोरी गोरंबे कागल रा.मा. क्र. 153 ला
मिळणारा राज्य मार्ग क्र. 195 दि. 8 सप्टेंबर पासून सिध्दनेर्ली पुलावर 1 फुट पाणी
असल्यामुळे वाहतूक बंद. ब्रिद्री, सोनाळी, बस्तवडे प्रजिमा क्र. 46 दिनांक 5
सप्टेंबर पासून बस्तवडे बंधाऱ्यावर 3 फूट पाणी असल्याने वाहतूक बंद असून इजिमा
क्र. 189 अनुर ते बानगे व इजिमा क्र. 93 बानगे मार्गे वाहतूक सुरू आहे. आलाबाद दौलतवाडी मुरगुड प्रजिमा क्र.50
मार्गावर स्पिल ते वरुन 2 फुट पाणी वाहत असून वाहतूक बंद. दौलतवाडी हळदवडे
बेलेवाडी मासामार्गे वाहतूक सुरु. सोनगे-बस्तवडे, कौलगे, चिखली, खा. कुर्ली राज्य
हद्द प्र.क्र. 47 रस्त्यावर 2 फुट पाणी असल्यामुळे वाहतूक बंद असून बस्तवडे सोनगे
मार्गे वाहतूक सुरु आहे.
राधानगरी
तालुक्यातील शिरगाव बंधाऱ्यावर असल्याने राधानगरी तालुक्यातील आरे, सडोली
खालसा, राशिवडे बु.,शिरगाव प्र.जि.मा.क्र.35 या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून
पर्यायी तारळे व राशिवडे मार्गे वाहतुक सुरू आहे. सरवडे मालवे तुरंबे प्रजिमा 98
मार्गावर तुरंबे बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद. सरवडे, मुदाळ तिट्टामार्गे
पर्यायी वाहतूक सुरु आहे.
शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारूण
उदगिरी प्र.जि.मा.क्र.1 मार्गावरील आरळा पुलावर व रस्त्यावर पाणी आल्यामुळे 5
सप्टेंबर पासून वाहतूक बंद आहे. शित्तूर, तुरूकवाडी, मलकापूर मार्गे पर्यायी
वाहतूक सुरू आहे. माळवाडी पुलावर पाणी आल्यामुळे शाहुवाडी तालुक्यातील तुरूकवाडी
कोतोली रेठरे सोंडोली खेडे शित्तूर तर्फ वारूण प्रजिमा क्र. 3 मार्गावरील वाहतूक
बंद आहे. पर्यायी तुरूकवाडी-कोकरूड-शेडगेवाडी-आरळा-शित्तूर मार्गे वाहतूक सुरू
आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील निलजी, नूल,
येणेचवाडी,नंदनवाड प्रजिमा 86 या मार्गावर
निलजी बंधाऱ्यावर पाणी असल्याने 6 सप्टेंबरपासून वाहतूक बंद आहे. पर्यायी
दुंडगे-जरळी-मुंगळी-नुल मार्गे वाहतूक सुरू आहे.
गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा, कोल्हापूर, पट्टणकोडोली,
हुपरी, रेंदाळ, जंगमवाडी राज्य हद्दीपर्यत राज्य मार्ग क्र. 177 वर मांडुकली
गावाजवळील ओढ्यावर 2 फुट पाणी असल्याने दि. 1 सप्टेंबर पासून वाहतुक बंद आहे, पर्यायी
मार्ग नाही.
शेनवडे, अंदूर,
धुंदवडे, चौधरवाडी, म्हासुर्ली, कोते, चांदे, राशिवडे बु. परिते प्रजिमा क्र. 34
या मार्गावर आंदुर बंधाऱ्यावर 3 फूट पाणी असल्यामुळे वाहतूक बंद आहे. पर्यायी
अनदुर,मणदुर वेतवडे,बालेवाडी प्रजिमा क्र. 25 मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.
परखंदळे आकुर्डे धुंदवडे जर्गी गगनबावडा प्रजिमा क्र.39 या मार्गावर गोठे पुलावर 1
फूट पाणी असल्याने वाहतूक बंद. पर्यायी मल्हारपेठ सुळे कोदवडे प्रजिमा 26 मार्गे
वाहतूक सुरु.
आजरा
तालुक्यातील नवले देवकाडगांव साळगाव प्रजिमा क्र .58 या मार्गावर साळगाव
बंधाऱ्यावर 3 फूट पाणी असल्यामुळे वाहतूक बंद आहे. पर्यायी 139 सोहाळे बाची मार्गे
वाहतूक सुरु.
चंदगड तालुक्यातील चंदगड, इब्राहिमपूर, आजरा, महागांव,
हलकर्णी, खानापूर, रा.मा. क्र. 201 ला मिळणारा दि. 29 जुलै पासून इब्राहीमपूर
पुलावर 2 फुट पाणी असल्यामुळे वाहतूक बंद.
रा. मा. 180 ते कनुर गवसे, इब्राहीमपूर मार्गे वाहतूक सुरु आहे.
अशा एकूण 4
राज्य मार्ग आणि 17 प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे.
00 0 0
0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.