गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

अतिवृष्टीमुळे 4 प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद -अधीक्षक अभियंता संभाजी माने



         कोल्हापूर, दि. 5 (जि. मा. का.) : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक आज बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली.
       चंदगड तालुक्यातील कोल्हापूर, परिते, गारगोटी, गडहिंग्जल, कोदाळी भेडसी ते राज्य हद्दमध्ये राज्य मार्ग क्रमांक 189 या मार्गावरल तिलारी घाटामध्ये 30 मीटर लांबीत रस्ता खचल्याने वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 5 जुलै पासून बंद असून आजरा, अंबोली, सावंतवाडी मार्गे वाहतूक सुरु आहे. करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराबाहेरील वळण रस्ता शाहू नाका, कळंबे, ऊजळाईवाडी रस्ता राज्य मार्ग क्रमांक 194 मार्गावर शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फुट पाणी असल्याने 31 ऑगस्ट रोजी वाहतूक बंद झाली आहे. करवीर तालुक्यातील कुडित्रे, कोगे, महे, देवाळे, दिंडनेर्ली, नंदगाव या प्रमुख जिल्हा मार्गावर कोगे बंधाऱ्यावर 2 फुट पाणी असल्यामुळे 31 ऑगस्टपासून बालिंगा, दोनवडे, घानवडे मार्गाने वाहतूक सुरु आहे. 
          आज सकाळपासून बस्तवडे बंधऱ्यावर 3 फूट पाणी असल्याने कागल तालुक्यातील बिद्री-सोनाळी-बस्तवडे, राधानगरी तालुक्यातील शिरगाव बंधऱ्यावर 4 फूट पाणी असल्याने आरे-सडोली खालचा-राशिवडे बुद्रुक, शाहूवाडी तालुक्यातील आरळा पुलावर व रस्त्यावर पाणी आल्यामुळे शित्तुर तर्फ वारुण-उदगिरी आणि माळवाडी पुलावर पाणी आल्यामुळे तुरुकवाडी-कोतोली, रेठरे, गोंडोली-सोंडोली, खेडे, शित्तुर तर्फ वारुण या प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक आज बंद झाली आहे. अशा एकूण 2 राज्य मार्ग आणि 5 प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक  पर्यायी मार्गाने सुरु आहे.
 00 0  0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.