बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी शासकीय नियमानुसार टिबी रुग्णांना औषधोपचार देणे गरजेचे - जिल्हाधिकारी दौलत देसाई


          


  कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.): खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी शासकीय नियमानुसार टिबी रुग्णांना औषधोपचार देणे आवश्यक आहे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            जिल्हास्तरीय टिबी फोरमची बैठक जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.प्रकाश पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, टीबी व चेस्ट विभाग प्रमुख डॉ.अनिता सैबन्नावर, हातकणंगलेचे आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमातील विविध विषयावरील सदस्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. 
            खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी शासकीय नियमानुसार टिबी रुग्णांना औषधोपचार देण्याबाबत आवश्यकतेनुसार जनजागृतीपर कार्यशाळा घेण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले की, जे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक शासनाकडील मोफत टिबी वरील औषध देतात त्यांना प्रोत्साहीत करावे व  तर खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही त्याचे अनुपालन करावे. टिबी रुग्णांना औषध सुरु करतेवेळी त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी जेणेकरून त्यांचे औषधे मध्येच बंद करण्याचे प्रमाण कमी होईल.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यावेळी म्हणाले, फोरमची  शासन नियमाप्रमाणे 6 महिन्यातून एकदा बैठक घेणे अपेक्षीत आहे. पण तीन महिन्यातून एकदा घेण्याच्या सूचना दिल्या. महापालिका आयुक् डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी फोरमच्या कामकाज बद्दल व कार्यक्रम विषयक सूचना दिल्या.
            जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उषा जी.कुंभार यांनी फोरमच्या कामकाजाची माहिती दिली. त्या पुढे म्हणाल्या, टिबी फोरमचा मुख्य उद्देश कार्यक्रमामध्ये सुलभता आणणे व समाज, रुग्ण, आरोग्य प्रणाली व नागरी व्यवस्था यांच्यामध्ये समन्वयक आणणे आहे. टीबी फोरम मध्ये विविध समाजघटक व विविध क्षेत्रामधील सदस्यांचा सहभाग आहे.  भारत सरकारने 2024 पर्यंत देश क्षयमुक्त करणेचे धोरण निश्चित केले असून त्या दृष्टीने  जिल्हास्तरीय टिबी फोरममार्फत कार्यवाही केली जाईल, असें सांगितले.      यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक भोई, आय. एम.ए.चे जिल्हा अध्यक्ष डॉ.संदीप साळोखे, जिल्हा समन्वयक दिपा शिप्पूरकर, डॉ.राजेश पोवार, सुधर्म वझे, रणजीत आवळे, अजित खोत, प्रमोद गायकवाड, श्वेताम्बरी जाधव, निलम शिरगावकर, विशाल मारूडा आदी उपस्थित होते.     
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.