सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

माजी सैनिकांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत - जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने



कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : सन 2019-20 वर्षाकरिता जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा यांनी व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या पाल्यांच्या पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन प्रक्रीयेव्दारे ksb.gov.in या वेबसाईटवर अर्ज भरून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी केले आहे.
        जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा यांना कळविण्यात येते की, KSB (केंद्रीय सैनिक बोर्ड) नवी दिल्ली यांच्याकडून प्रत्येक वर्षी व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मुलींना 36 हजार रूपये व मुलांना 30 हजार रूपये आर्थिक मदत दर वर्षी शिक्षण पूर्ण होईपर्यंत दिली जाते. पाल्यांनी व्यावसायीक शिक्षणास प्रवेश घेतल्याबरोबरच ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे गरजेचे आहे. त्याकरिता पाल्यास इयत्ता 12 वी किंवा डिप्लोमास 60 टक्केच्यावर गुण असणे गरजेचे आहे. जास्तीत-जास्त माजी सैनिक,विधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.