बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

मोठ्या संख्येने मतदान करुन जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावे - जिल्हाधिकारी दौलत देसाई






        कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : जिल्ह्यातील दहा मतदार संघासाठी सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांनी संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क मोठ्या संख्येने बजावून कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
            जिल्ह्यामध्ये 15 लाख 6 हजार 308 महिला, 15 लाख 84 हजार 271 पुरुष आणि 81 इतर असे एकूण 30 लाख 90 हजार 660 मतदार आहेत. काल दि. 24 सप्टेंबर पर्यंत ज्यांनी नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज केले आहेत अशा पात्र नवीन मतदारांचाही यामध्ये समावेश होईल. मतदानाचा पवित्र हक्क आपल्याला संविधानाने दिला आहे. जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढविली आहे. जिल्ह्यातील पात्र मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करुन कोल्हापूर जिल्ह्याचा मतदानातील नावलौकिक कायम ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.
मतदान जनजागृती
            ‘आपले बोट... आपला आवाज ! एक थेंब शाईचा... कर्तव्य आणि अभिमानाचा’ हा आणि ‘मी तर नाही मतदान करु शकत पण तुम्ही करा, माझ्या भविष्यासाठी...’ हा बोलका फलकही जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मतदान जनजागृतीसाठी लावण्यात आला आहे. त्याच बरोबर 277 शाहूवाडी विधानसभा मतदार संघात शाहू हायस्कूल शाहूवाडी येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.  गर्ल्स हायस्कूल मलकापूर येथे रांगोळी स्पर्धा घेवून मतदान जनजागृती करण्यात आली. केंद्र शाळा सरुड विद्यामंदीर क्रमांक तीनच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. 
0  00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.