कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.)
: करवीर तालुक्यातील राज्य मार्ग क्र. 194 वरील कि.मी. 14/750 येथे शिंगणापूर
के.टी. वेअर जवळ पाईल राफ्ट पायावर आधारित बॉक्स रिटर्न वॉल बांधण्याचे काम सुरू
करण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती उप अभियंता
धनंजय भोसले यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम
विभागामार्फत 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कामामध्ये रस्त्याचे
वारंवार वाहून जाणारे लांबीचे पूर्णपणे खोदाई करून काम करावे लागणार आहे. या
कामासाठी 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे. हे काम करताना एका बाजूस खाजगी शेती
असून शेतीमध्ये ऊसाचे पीक व दुसऱ्या बाजूस नदी आहे, त्यामुळे काम करताना या
रस्त्यावरील शिंगणापूर ते चिखली मार्गे जाणारी सर्व प्रकारची लहान-मोठ्या वाहनांची
वाहतुक बंद करावी लागणार आहे. या रस्त्याने जोडणाऱ्या गावांना पर्यायी मार्ग
उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, असेही श्री. भोसले यांनी
कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.