कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.)
: किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि. व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला संवेदना जागर 2020 चा सांगता सोहळा गुरूवार
दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 11 वा. शाहू स्मारक भवन येथे जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा
शिपुरकर यांनी दिली.
कार्यक्रमास
महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार
बोरसे, किर्लोस्कर ऑईल लि. चे प्लांट हेड चंद्रहास रानडे, राजर्षी छत्रपती शाहू
महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या
उपस्थितीत व अभिनेत्री स्मिता शेवाळे यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.