कोल्हापूर, दि. 4
(जि.मा.का.) : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयासमोरील शिवाज या शिवभोजन केंद्राला आज भेट देवून दर्जा आणि स्वच्छता याची
पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,
तहसिलदार शीतल मुळे-भामरे यावेळी उपस्थित होत्या.
शिवाज शिवभोजन केंद्रातील
भोजनाचा दर्जा, स्वच्छता याची पाहणी करून डॉ. म्हैसेकर यांनी उपस्थित लाभार्थ्याशी
संवाद साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्याचबरोबर किती वाजेपर्यंत थाळ्या
संपतात. लाभार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया असते याबद्दल त्यांनी केंद्र चालक पी.जी.
मांढरे यांच्याशीही संवाद साधून माहिती घेतली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.