कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.)
: जिल्हा वार्षिक योजना आराखड्यानुसार उपलब्ध होणारा निधी येत्या मार्च अखेर 100
टक्के खर्च करण्याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री
सतेज पाटील यांनी दिले.
जिल्हा नियोजन
समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीचा विभागनिहाय आढावा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालील
बैठकीत आज घेण्यात आला. येथील शासकीय विश्रामगृहाच्या राजर्षी शाहू सभागृहात
झालेल्या बैठकीस महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील,
जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक
डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, समाज कल्याणचे सहायक
आयुक्त बाळासाहेब कामत उपस्थित होते.
पालकमंत्री यांनी या
बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना आणि अनुसूचित
जाती उपयोजनेच्या खर्चाचा विभागनिहाय आढावा घेतला सर्व विभागांनी त्यांना उपलब्ध
होणाऱ्या निधीचा त्या-त्या योजनांवर येत्या 15 दिवसांत विनियोग करावा, असे
निर्देशही त्यांनी दिले. निधी उपलब्ध होऊनही तो खर्च न
झाल्यास त्यांची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखाची राहील यांची दक्षता घेण्याचे
निर्देश त्यांनी दिले.
प्रारंभी जिल्हा
नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी स्वागत करुन जिल्हा नियोजन समितीच्या
कार्यक्रमाची रुपरेषा सांगितले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.