सोमवार, २ मार्च, २०२०

यळगुड व एमआयडीसी कागल पोस्ट ऑफिसमधील गैरव्यवहार चौकशी खातेदारांनी 5 मार्च पूर्वी माहिती द्यावी



कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : यळगुड शाखा डाकघर व पंचतारांकित एमआयडीसी कागल पोस्ट ऑफिसमध्ये ठेवीदारांच्या ठेवी व गुंतवणूकीबाबत काही कागदपत्रे असतील तर डाक निरीक्षक कागल सध्या मुक्काम यळगुड शाखा डाकघर यांच्याशी ठेवीदार व खातेदारांनी 5 मार्च पूर्वी त्वरीत संपर्क साधून आवश्यक माहिती द्यावी, असे आवाहन प्रवर अधीक्षक इश्वर पाटील यांनी केले आहे.
यळगुड शाखा डाकघर व पंचतारांकित एमआयडीसी कागल पोस्ट ऑफिसमध्ये गैरव्यवहाराची चौकशी डाक निरीक्षक कागल मार्फत यळगुड शाखा डाकघर ग्रामपंचायत कार्यालय यळगुड येथे चालू आहे. संबंधित खातेदारांना यापूर्वी चौकशी समितीशी संपर्क साधून आपल्याकडे असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या विविध योजना व खाती यांच्यामधील शिल्लक रक्कमांची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच लेखी पत्रही दिली आहेत. हे चौकशी कामकाज दिनांक 5 मार्च पर्यंत पूर्ण केले जाणार असून नंतर आलेल्या तक्रारींची दखल घेता येणार नाही, असेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.