सोमवार, १ जुलै, २०१९

रुग्णालयातील दुकानातूनच औषध खरेदीची सक्ती नाही


फलक प्रदर्शित करण्याच्या सहायक आयुक्तांच्या सूचना

          कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :  रुग्णालयातील औषध दुकानातूनच रुग्णांनी औषध खरेदी करावी अशी सक्ती नाही. रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवाना धारक औषध विक्रेत्याकडून औषधाची खरेदी करु शकतात, असा फलक प्रदर्शित करण्याच्या सूचना औषधे म.स.जवंजाळपाटील यांनी दिल्या आहेत.
          जिल्ह्यातील महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दवाखाने व रुग्णालयाची नोंदणी ही जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग महानगरपालिका यांच्याकडे तर उर्वरित क्षेत्रातील नोंदणी ही जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे असते. रुग्णालयातील औषध दुकानातूनच रुग्णांनी औषध खरेदी करावी अशी सक्ती नाही. रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवाना धारक औषध विक्रेत्याकडून औषधाची खरेदी करु शकतात, असा फलक रुग्णालयातील औषध दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या दर्शनी भागात रुग्णांना दिसेल अशा ठळक अक्षरात प्रदर्शित करावा, अशा सूचना श्री. जवंजाळपाटील यांनी दिल्या आहेत. याबाबत औषध निरीक्षकांना कार्यवाही करण्याबाबतही निर्देश दिलेले आहेत.
          असा फलक रुग्णालयात प्रदर्शित करण्याबाबत संबंधित रुग्णालयाला आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष यांनी कळवावे, अशीही त्यांनी सूचना दिली आहे.           
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.