बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा प्रचार सर्व स्तरावर करा - जिल्हाधिकारी दौलत देसाई





        कोल्हापूर दि. 4 :  प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा ग्रामीण दुर्गम भागातील गरजू आणि होतकरु व्यक्तीपर्यंत होण्याच्या हेतून या योजनेचा प्रचार बँका, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, नगरपंचायती अशा सर्व स्तरावर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
            प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली या बैठकीला समितीचे सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राहूल माने, अशासकीय सदस्य श्रीमती अर्चना रिंगणे, नचिकेत भुर्के, तानाजी ढाले, नामदेव चौगुले, नाथ देसाई आदी उपस्थित होते.
            समितीच्या सचिव श्रीमती यादव यांनी सर्वाचे स्वागत करुन प्रास्ताविकात केले. जिल्ह्यासाठी या योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी 21 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबत विविध माध्यमातून प्रसिध्दी करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.  जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. माने यांनी 2017 पासून या योजनेअंतर्गत जिल्ह्यात वाटप झालेल्या कर्जाची माहिती दिली.  2016-17 साठी 31 हजार 102 लाभार्थ्यांना 621 कोटी 76 लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे.  2017-18 साठी 36 हजार 813 लाभार्थ्यांना 639 कोटी 4 लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे.  2018-19 साठी  35 हजार 493 लाभार्थ्यांना 632 कोटी 78 लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे. 2019-20 साठी 19 हजार 555 लाभार्थ्यांना 153 कोटी  93  लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे.
            जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, नगरपंचायती, नगरपरिषद, ग्रामपंचायत, सर्व शासकीय कार्यालये याठिकाणी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची माहिती देणारे फलक प्रदर्शित करावेत. सर्व बँकांच्या दर्शनी भागात स्टॅडीज लावावेत. होर्डींग्ज, आकाशवाणी, एफ एम वाहिन्या यावरुनही या योजनेची प्रसिध्दी करावी. कलापथक, कॉफी टेबल बुक त्याचबरोबर स्थानिक केबल वाहिन्यावरुन योजनेची प्रभावीपणे प्रसिध्दी करावी. बँकांनीही  या योजनेच्या लाभार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही  त्यांनी केले. 
000000

           


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.