मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

पाणी पुरवठा योजना न करणाऱ्या कंत्राटदाराला आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली नोटीस द्या - जिल्हाधिकारी दौलत देसाई




        कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) :  पन्हाळा नगरपालिकेचे पाणी पुरवठा योजनेचे काम न करणाऱ्या कंत्राटदाराला आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली नोटीस द्या, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी यांना आज दिले.
       आपत्तीग्रस्त भागातील नुकसानीबाबत सर्व विभाग प्रमुखांची जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई, जिल्हा शल्यचिकित्स डॉ. बी.सी.केम्पीपाटील आदी उपस्थित होते.
          आपत्तीग्रस्त भागात झालेल्या नुकसानीची  माहिती उद्या पर्यंत सादर करावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या विभागाची सविस्तर माहिती सादर करावी. यामध्ये नुकसान कसे झाले याबाबत स्वतंत्र टिपणी जोडवी. इमारती, रस्ते, आरोग्य विभागाचे झालेले नुकसान, पाणी पुरवठा योजनेचे झालेले नुकसान, दरड ढासळून झालेले नुकसान असा समावेश असावा. आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या जनावरांसाठी खाद्य पुरवठ्याबाबत श्री. सिध्दीविनायक ट्रस्टला पत्र पाठवावे, अशा सूचना पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए. पठाण यांना केल्या.  बुरशी तसेच डास प्रतिबंधक फवारणी आपत्तीग्रस्त गावात करावी यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचनाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांना दिल्या.
          पन्हाळा नगरपालिकेने कंत्राटदाराला दिलेले पाणी पुरवठा योजनेचे काम, त्यांने पूर्ण केले नाही. त्या कंत्राटदाराला आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत नोटीस द्यावी, असे आदेशही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिले.
 0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.