मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक कल्याण संघटक यांचा सप्टेंबर दौरा



        कोल्हापूर, 3 (जिमाका): सर्व माजी सैनिक/विधवा/अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचबरोबर कल्याण व पुनर्वसनाच्या दृष्टिने योजना व सवलतींची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथील कल्याण संघटक यांचा माहे सप्टेंबर 2019 चा दौरा खालीलप्रमाणे  आयोजित केला आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त माजी सैनिक/विधवा/अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
            पहिला मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2019 रोजी राधानगरी  येथे तहसिलदार कार्यालय, राधानगरी,  पहिला बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2019 रोजी गडहिंग्लज येथे गडहिंग्लज ता तहसिलदार कार्यालय, गडहिंग्लज. पहिला गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी कागल येथे तह. कार्यालय, कागल. दुसरा गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2019 रोजी मा.सै. सं. टाकळी ता. शिरोळ दुसरा शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी गिरगांव येथे मा. सै. संघटना कार्यालय गिरगांव,ता. करवीर. तिसरा मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी हातकणंगले, येथे तह. कार्यालय, हातकणंगले. तिसरा बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2019 रोजी भुदरगड, तहसिल कार्यालय गारगोटी. तिसरा गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2019 रोजी शाहूवाडी तहसिल कार्यालय, शाहूवाडी तिसरा शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2019 रोजी आजरा येथे तहसिल कर्यालय आजरा. चौथा मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2019 रोजी शिरोळ येथे तह.कार्यालय,शिरोळ. चौथा गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2019 रोजी मा. सै. सं. कोवाड येथे ता. चंदगड. चौथा शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2019 रोजी पन्हाळा येथे तह. कार्यालय, पन्हाळा.
              सर्व तहसिल कार्यालयातील दौरे  निर्देशित ठिकाणी सकाळी 11 ते 3 या वेळेत होतील. दौऱ्यादिवशी    शासकीय सुट्टी असल्यास त्या तालुक्याचा दौरा पुढील महिन्यात घेण्यात येईल.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.