कोल्हापूर, दि. 17 (जि.मा.का.) : खाजगीरित्या 10 वी व 12 वी साठी प्रविष्ठ
होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज 20 डिसेंबरपर्यंत अतिविलंब शुल्काने ऑनलाईन
पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुरेश आवारी
यांनी दिली.
अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर
मराठी व इंग्रजीमधून उपलब्ध आहे. माध्यमिक शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिविलंब
शुल्क प्रती विद्यार्थी 20 रूपये प्रतीदिन स्वीकारून विभागीय मंडळाकडे 20 डिसेंबरपर्यंत
ऑनलाईन पध्दतीने भरता येतील.
खाजगी
विद्यार्थ्यांनी इ. 10 वी व 12 वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे
आहेत. कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इ.
10 वी साठी http://form17.mh-ssc.ac.in
व इ. 12 वी साठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा
वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/ इंग्रजीमधून उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांने
अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), मूळप्रत नसल्यास व्दितीयप्रत व
प्रतिज्ञापत्र किंवा महा-ई-सेवा केंद्र सेतू मधून दुय्यम दाखला सादर करीत असल्याबाबचे
प्रतिज्ञालेख, मूळ मार्कशीट व मूळ प्रमाणपत्र, आधारकार्ड, स्वत:चा सद्याचा पासपोर्ट
आकारातील फोटो इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.
कागदपत्रे
स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्कॅनर, मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज
भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर
पाठविली जाणार आहे. या भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट, शुल्क पावती व हमीपत्र दोन प्रतीत काढून
घ्यावी.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.