कोल्हापूर, दि. 5 :
छत्रपती शिवाजी पदभ्रमण मोहिमेची उद्या दि. 6 डिसेंबर रोजी सांगता होत आहे.
श्रीलंकेतील 6 छात्र सैनिकांसह देशातील 1 हजार छात्र सैनिक या पदभ्रमण मोहिमेत
सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी पदभ्रमण मोहीम पूर्ण
करुन परतलेल्या छात्र सैनिकांसाठी ग्रुप कमांडर कार्यालयात सांस्कृतिक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत
पाटील, अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांनी भेट देवून या छात्र
सैनिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर आर.बी.डोगरा, कर्नल
के.के.मोरे, कर्नल राजेश शहा, कर्नल आर.बी. होला, कर्नल एम.के. तिवारी, लेप्टनंट
कर्नल सुनील नायर आदी उपस्थित होते.
एन.सी.सी भवन मध्ये स्वयपाक घर, गोदाम,
स्वच्छतागृहे त्याच बरोबर 200 मुलींसाठी वसतिगृहाची इमारत, ग्रुप कमांडर कक्ष
नुतनीकरण, वाहनतळ, आतील रस्ते, गन गॅरेज इमारत, परेट ग्राऊंडचे काँक्रीटीकरण,
अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आदी सुविधा तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांच्या माध्यमातून, लोकसहभागातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात
आल्याची माहिती ब्रिगेडीअर श्री. डोगरा यांनी यावेळी दिली.
गेले आठ दिवस चालणाऱ्या या पदभ्रमण मोहिमेची
उद्या सांगता होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
0 0 0 0 000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.