कोल्हापूर दि. 5 (जि.मा.का.) : चंदगड डाक कार्यालय चंदगड येथे आजपासून उद्या दि.
6 डिसेंबरपर्यंत विशेष आधार अद्ययावत व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी
माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
इचलकरंजी
प्रधान डाक घर येथे दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते संध्या. 5 वाजेपर्यंत आधार अद्ययावत
व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ग्राहकाला आपले आधार मधील
नाव, पत्ता, जन्मतारीख व मोबाईल क्रमांक यामध्ये दुरूस्ती करता येईल, तसेच नवीन आधार
नोंदणी करता येईल.
चंदगड
तालुक्यातील जास्तीत-जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी
केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.