कोल्हापूर, दि. १३ (जि.मा.का.)
: इचलकरंजी शहरातील शांतीनगर, कोरोची, कबनूर परिसरात राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस
पथकाने विविध ९ ठिकाणी छापे टाकून अवैध तयार हातभट्टी, देशी, विदेशी दारु असा १लाख
४७ हजार ३८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या छाप्यातील ७ आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन
करणारे ६ अशा १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
विविध
ब्रॅन्डच्या देशी मद्याच्या एकूण २२४ बाटल्या, विदेशी मद्याच्या १८ बाटल्या व बिअरच्या
२४ बाटल्या, हातभट्टी दारु २९४ लि. एक मोटारसायकल, दोन टीव्ही, पाच 200 लि क्षमतेचे
प्लाटिक बॅरेल, साऊंड सिस्टीम दोन, ३५ लि. क्षमतेचे पाच प्लास्टिक कॅन जप्त करण्यात
आले. या कारवाईत अनिल शिकलगार, ज्योती गारुंगे, बबिता मलके, शांताराम साईल, रुपसिंग
गागडे, सुदेश गागडे, यशवंत पाटील यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या शिवाजी कोष्टी, कुमार दिगे, जयसिंग खबाले,
भरत रजपूत, मारुती शेवाले व बाळू पाटील यांच्या विरुध्दही गुन्हा नोंद करण्यात आला
आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय
आयुक्त वाय.एम.पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, उपविभागीय पोलीस
अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक बी.आर. चौगुले, गावभाग पोलीस
ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
श्री. ओमासे, विभागाचे निरीक्षक पी.आर.पाटील तसेच शाहूवाडी, कागल व जिल्हा भरारी पथकाचे
दुय्यम निरीक्षक के.बी.नडे, दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे, अतुल पाटील यांच्यासह दोन्ही
विभागातील सुमारे 60 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
इचलकरंजी
शहरात अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी अवैद्य मद्य निर्मिती साठा अथवा विक्री आढळून आल्यास
तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यावंर कडक कारवाई करुन यापुढेही अशाप्रकारची मोहीम
राबविण्यात येणार असल्याचे निरीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
0
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.