कोल्हापूर, दि. 9 (जि.मा.का.)
: महिला सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट पत्रकारिता
केलेल्या पत्रकारांसाठी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार योजना जाहीर झाली असून या
योजनेसाठी पत्रकारांनी आपले प्रस्ताव 12 डिसेंबर पूर्वी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर करावे असे आवाहन
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापकांनी केले
आहे.
ग्राम विकास विभागाच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी
उत्कृष्ट पत्रकारिता केलेल्या पत्रकारांसाठी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देण्यात
येतो. यामध्ये पत्रकारांनी स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व
त्यांना चालना व प्रेरणा देण्याच्या उद्देशाने केलेले कार्य महत्वाचे आहे. तरी जिल्ह्यातील
पत्रकारांनी या पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव 12 डिसेंबर 2019 पूर्वी जिल्हा ग्राम विकास
यंत्रणा, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सादर करावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.