कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.) : खरीप हंगाम सन 2019-20 साप्ताहिक हवामान, पेरणी
व पिक परिस्थिती अहवालानुसार 27 नोव्हेंबरअखेर खरीप व रब्बी हंगामासाठी वातावरण सुर्यप्रकाशयुक्त
होते. हवेमध्ये थंडीचे प्रमाण होते.
जिल्ह्याचे
वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1899.04 मि.मी. इतके आहे. माहे जून अखेर 243.36 मि.मी.,
माहे जुलै अखेर 644.32 मि.मी., माहे ऑगस्ट चे सरासरी पर्जन्यमान 477.88 मि.मी. इतके
असून ऑगस्टअखेर 833.17 मि.मी., माहे सप्टेंबरचे सर्वसाधारण पर्जन्यमान 199.3 मि.मी.
व माहे ऑक्टोबरचे सर्वसाधारण पर्जन्यमान 126.68 मि.मी. असून दिनांक 31 ऑक्टोबर अखेर
240.58 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू असून माहे
नोव्हेंबरचे सरासरी पर्जन्यमान 37.70 मि.मी. असून 27 नोव्हेंबर अखेर 14.46 मि.मी. पावसाची
नोंद झाली आहे.
रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अद्याप सुरू
आहे. पेरणी झालेल्या रब्बी ज्वारी तसेच अन्य पिकाची उगवण समाधानकारक आहे. जिल्ह्यामध्ये
रब्बी ज्वारी 3991 हेक्टर, गहू 168 हेक्टर, मका 232 हेक्टर, हरभरा 1182 हेक्टर, क्षेत्रावर
पेरणी झाली आहे. त्याचप्रमाणे तंबाखू 192 हेक्टर,
भाजीपाला 179 हे. व चारापिके 322 हेक्टर, क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
ऊसाचे सन 2019.20 मधील सर्वसाधारण क्षेत्र
1 लाख 42 हजार 336 हेक्टर आहे. सन 2018-19 मधील 1 लाख 55 हजार 584 हेक्टर क्षेत्रावर
ऊस पिक आहे. महापुरामुळे नदिकाठच्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेा. फक्त
59 हजार 500 हेक्टर क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध
होणार आहे. सन 2019-20 मधील नवीन आडसाली हंगामातील आतापर्यंत 11 हजार 724 हेक्टर क्षेत्रावर
लागण झाल्याची नोंद झाली आहे. पुर्व हंगामी
लागणीची कामे सुरू आहेत. आतापर्यंत 5 हजार हेक्टर लागणीची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे
जमीनीची मशागत झाली नसल्याने लागणीची कामे खोळांबली होती, आता ती सुरू झाली आहेत. सन
2018-19 मधील लागण झालेला ऊस काढणीसाठी तयार झाला असून गळीत हंगामास सुरूवात झाली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.