गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला



        कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.) : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिन काल शाहू स्मारक भवन येथे साजरा करण्यात आला.
        कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रेरणा कट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) श्रीमती पद्मा कदम, अपर चिटणीस संतोष कणसे, करवीर तहसिलदार श्रीमती शितल भामरे-मुळे, सेंट झेविअर्सचे मुख्याध्यापक फादर जेम्स थोरात, अस्लम तडसकर, महिला बाल विकास अधिकारी बी.जी. काटकर आदी उपस्थित होते.
            अपर चिटणीस संतोष कणसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी, श्रीमती प्रेरणा कट्टे, श्रीमती पद्मा कदम यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेविषयी मार्गदर्शन केले. अल्पसंख्यांक समुदाय अभ्यासक आनंद म्हाळुंगकर, दक्षिण भारत जैन सभेचे अनिल गडकरी, राजर्षी शाहू मुस्लिम वेलफेअर संघटनेचे दस्तगीर मुल्ला यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उदय कांबळे व अस्लम तडसकर यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती दिली.
            निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबतची माहिती दिली. नायब तहसिलदार अनंत गुरव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
            कार्यक्रमास जहाँगीर हझरत, विजयानंद मालेकर, संदिप चिंचवाडे, राजू जगताप, मुसा अल्लाबक्ष नदाफ, सुनिता खंजिरे, मकसुम जमादार, अँथणी डिसोझा, सिमरन बारगीर, बालन पठाण आदी उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.