कोल्हापूर, दि. 11 (जि.मा.का.): येथील मध्यवर्ती
प्रशासकीय इमारतीत असणाऱ्या जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या
हस्ते आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हिरकणी’
कक्षाचे आज उद्घाटन झाले.
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, उपसंचालक
आरोग्य सेवा मंडळाच्या सहाय्यक संचालक डॉ. उज्ज्वला माने, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.जी. काटकर, विभागीय कार्यक्रम अधिकारी
आशा कुडचे, सांख्यिकी अधिकारी अरूण जाधव आदी उपस्थित होते.
आपल्या तान्हुल्याला पाजण्यासाठी रात्रीच्या गडद अंधारात रायगडचा
उभा कडा उतरून जाणाऱ्या हिरकणीच्या धैर्याचे आणि शौर्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी
साडी-चोळीचा आहेर देवून तीचे कौतुक केले होते.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कामगार न्यायालय, ग्राहक न्यायालय,
पुनर्वसन कार्यालय, अन्न-धान्य वितरण कार्यालय, निबंधक कार्यालय, आरोग्य उपसंचालक
कार्यालय अशी विविध कार्यालये आहेत. या इमारतीत विविध अभ्यागत दररोज येत असतात. या
कार्यालयात मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी आहेत. याचा विचार करून स्तनदा माता आणि
बालकांची सोय व्हावी, या हेतूने जिल्हा माहिती कार्यालयाने हिरकणी कक्षाची निर्मिती
केली. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्या हस्ते
आज या कक्षाचे उद्घाटन झाले.
हिरकणी कक्षाचा महिलांना फायदा-
जिल्हाधिकारी
या
उपक्रमा विषयी जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी शुभेच्छा देताना जिल्हा माहिती कार्यालयाने प्रशासकीय इमारतीत हिरकणी
कक्षाची सुरूवात करून महिला प्रती संवेदनशील आहोत हे दाखवून दिले आहे. याचा फायदा व
उपयोग प्रशासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांना होईल यात कोणताही संदेह नाही, असा अभिप्राय
नोंदविला. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही शुभेच्छा दिल्या.
स्तुत्य आणि निकडीचा विषय-डॉ.
उज्ज्वला माने
जिल्हा
माहिती कार्यालयाने अतिशय स्तुत्य आणि निकडीचा विषय हिरकणी कक्ष सुरूवात करून राबविला. याचा फायदा महिलांसाठी होणार आहे, असा अभिप्राय
डॉ. उज्ज्वला माने यांनी नोंदविला.
उपस्थितांनी अनुभवला गुळ-शेंगाचा
पाहुणचार
जिल्हा
माहिती कार्यालयामध्ये येणारे अधिकारी, कर्मचारी,
पत्रकार तसेच अभ्यागतांना सेंद्रीय गुळ, देशी शेंगा आणि पाणी असा पाहुणचार दिला जातो.
हिरकणी कक्ष उद्घाटनाच्या निमित्ताने आज उपस्थितीत असणाऱ्या पाहुण्यांनी या पाहुणचाराचा
अनुभव घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.