कोल्हापूर, (जि.मा.का.)
दि. 2 : जागतिक एड्स
दिन " समाज बदल घडवू शकतो" च्या निमित्ताने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सी. पी. आर. हॉस्पिटल, कोल्हापूर आणि संवेदना जागर, सामाजिक बांधिलकी उपक्रम, किर्लोस्कर ऑईल
इंजिन्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने घोष वाक्य तसेच पोस्टर डिझाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची
माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी दिली.
एचआयव्ही एड्स आणि युवा वर्ग, एचआयव्ही एड्स
आणि अतिजोखमीचा गट व एचआयव्ही एड्स अणि कलंक भेदभाव असे या स्पर्धेचे विषय आहेत.
घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या
स्पर्धकांसाठी प्रथम क्रमांकास ५०० रू. आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास
३०० रू. आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास २०० रू. आणि
सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.
पोस्टर डिझाईन स्पर्धेतील विजेत्या
स्पर्धकांसाठी प्रथम क्रमांकास १ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास
७०० रू. आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास ५०० रू. आणि सन्मानचिन्ह अशी बक्षीसे
देण्यात येणार आहेत.
दोन्ही स्पर्धेसाठी सहभाग पूर्ण मोफत
असेल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली घोषवाक्ये तसेच पोस्टर 6 डिसेंबर
रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत संयोजकांकडे
जमा करावीत. अधिक माहितीसाठी कपिल मुळे
९७६७८९७४१४ व संदिप पाटील ९७३०६५२२२२ यांच्याशी संपर्क साधावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.