बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

जिल्हा व तालुकास्तरीय आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण



कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.) : जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या जिल्हा व तालुकास्तरीय आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना दिनांक 2 0डिसेंबर 2019 रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारास रक्कम रुपये 10 हजार व तालुकास्तरावरील उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना प्रत्येकी रक्कम रुपये 5 हजार देण्यात येणार असून गौरव चिन्ह, फेटा, शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. 
            पत्रकारांसाठी सन 2019-20 मध्ये जिल्हास्तरासाठी एक प्रस्ताव प्राप्त होता व तालुकास्तरावरुन 12 पैकी 10 तालुक्यांकडून एकूण 17 प्रस्ताव प्राप्त होते. जिल्हास्तरावर एक पुरस्काराची निवड करण्यात आली व तालुकास्तरावर 17 प्रस्तावांपैकी 8 सर्वोत्कृष्ट पत्रकारांची निवड करण्यात आली असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) रवीकांत अडसूळ यांनी कळविले आहे. 
जिल्हा व तालुकास्तर आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे, जिल्हास्तर कृष्णात
            चंद्रकांत चौगले, वरिष्ठ पत्रकार, दै. तरुण भारत व तालुकास्तरावरील पत्रकार रविराज विश्वास पाटील, तालुका भुदरगड, दै. पुढारी. विजयकुमार रामचंद्र दळवी, तालुका चंदगड, दै. तरुण भारत. अबीद आल्ताफहुसेन मोकाशी, तालुका पन्हाळा, दै. तरुण भारत. निवृत्ती सखाराम पाटील, तालुका कागल, दै. पुढारी. पंडित पांडुरंग सावंत, तालुका गगनबावडा, दै. सकाळ. आयुब आदम मुल्ला, तालुका हातकणंगले, दै. लोकमत.  बशीर सिंकदर मुल्ला, तालुका आजरा, दै. पुण्यनगरी व अनिल पाटील, तालुका शाहूवाडी, दैनिक पुढारी अशी आहेत.
0 0 0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.