सोमवार, २ डिसेंबर, २०१९

दिव्यांग दिनानिमित्त आज प्रभात फेरी



कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : 59 व्या दिव्यांग दिनानिमित्त जिल्ह्यातील 23 विशेष शाळांच्यावतीने उद्या मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी प्रभात फेरी काढण्यात येणार  असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.
       समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 7.30 वा. अंधशाळा मिरजकर तिकटी येथून प्रभात फेरीची सुरूवात होणार आहे. सकाळी 9 वा. केशवराव भोसले नाट्यगृहात दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तुंचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते होणार असून दिव्यांग विद्यार्थ्यांनी चितारलेल्या चित्रकला दालन व रांगोळी दालनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर विशांत महापुरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते दिव्यांग मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटनही होणार आहे.
          या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण अधिकारी श्री. घाटे  यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.