मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग



           कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.) : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातून व इतर ठिकाणाहून ऊस वाहतूक केली जाणार आहे. शहरातील वाहतूक सुरक्षित व नियंत्रित रहावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून  पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
       जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस वाहतूक ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली व बैलगाड्या या वाहनांच्या मदतीने होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 34 प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल केले आहेत.
        ऊस वाहतूक  करणाऱ्या वाहनांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा-
राजाराम कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ताराराणी पुतळा- तावडे हॉटेल- महामार्ग क्र. 4- महामार्ग क्र. 4 शिये सर्व्हिस रोड- कसबा बावडा मेन रोड - राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्थ व्हावे.
           गगनबावडा, राधानगरी व गारगोटीकडून - फुलेवाडी नाका- रिंग रोड- नवीन वाशी नाका-रिंगरोड- कळंबा- संभाजीनगर सिग्नल चौक- रिंगरोड- सायबर चौक- हायवे कॅन्टीन चौक- टेंबलाई उड्डाण पूल- ताराराणी पुतळा- सदर बाजार चौक- धैर्य प्रसाद हॉल चौक- हेड पोस्ट ऑफिस- पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर - कसबा बावडा- राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्थ व्हावे.
           डी वाय पाटील कारखाना व कुडीत्रे कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ताराराणी पुतळा- टेंबलाई उड्डाण पूल- हायवे कॅन्टीन चौक- सायबर चौक- रिंग रोड- संभाजीनगर चौक- कळंबा- रिंग रोड - नवीन वाशी नाका- फुलेवाडी नाका मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे.
          बिद्री कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ताराराणी पुतळा- टेंबलाई उड्डाण पूल- हायवे कॅन्टीन चौक- सायबर चौक - रिंग रोड- संभाजीनगर मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे.
           भोगावती कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ताराराणी पुतळा- टेंबलाई उड्डाण पूल - हायवे कॅन्टीन चौक - सायबर चौक- रिंग रोड - संभाजीनगर चौक - कळंबा - नवीन वाशी नाका मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे.
          दत्त दालमिया कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तावडे हॉटेल कडून - महामार्ग क्र. 4 शिये सर्व्हिस रोड- भुयेवाडी मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे.
          सर्व ऊस वाहतूक वाहनांना सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत शहरातून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. हे आदेश ऊस गाळप हंगाम पूर्ण होईपर्यंत लागू राहतील, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
00000







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.