कोल्हापूर,
दि. 23 (जि.मा.का.) : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीमार्फत जानेवारी
2020 मध्ये महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले असल्याची
माहिती कार्यकारी संचालक आर.के. शिंदे यांनी दिली.
प्रश्नमंजुषा स्पर्धा 16 ते
18 जानेवारी रोजी एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथे होणार आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे
6 हजार, 7 हजार 8 हजार, 9 हजार व 10 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. अधिक
माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 020-26999001 व भ्रमणध्वनी क्रमांक 9730587831 असा आहे.
वक्तृत्व
स्पर्धां 22 ते 24 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे
होणार आहेत. यासाठी अनुक्रमे 15 हजार,10 हजार व 5 हजार तसेच सन्मानार्थ रुपये 3 हजार
ची दहा पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक
02162-231074 व भ्रमणध्वनी क्रमांक 9850555938 असा आहे. या दोन्ही स्पर्धांचे नियम
व अटी www.erayat.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.