गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

औरंगाबाद येथे 10 ते 12 जानेवारीला माजी सैनिकांसाठी भरती



कोल्हापूर, दि. 12 (जि.मा.का.) : 136 इन्फंट्री बटालियन जे.सी.ओ. सोल्जर जी.डी.और ट्रेडमन पदांची भरती 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत औरंगाबाद येथे होत आहे. जे.सी.ओ. आणि सोल्जर जी.डी.ची भरती केवळ महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिकांसाठी आणि ट्रेडमनची भरती संपूर्ण भारतातील माजी सैनिकांसाठी आहे. या भरतीसाठी आर्मी, नौदल, वायुदल यामधून 5 वर्षात सेवानिवृत्त  झालेले जे.सी.ओ. आणि जवान किंवा महाराष्ट्र वनविभागातील सेवानिवृत्त महिला सहभागी होवू शकतात.
          भरती प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर भरती झालेल्या जे.सी.ओ. आणि जवानांचा बेस 136 इन्फंट्री बटालियन इकोलॉजिकल महारचा मिलिटरी कॅप होईल किंवा झाडे लावणे व त्यांची देखभाल करणे हे त्यांचे प्रमुख काम राहील.
          भरतीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- पात्रता सेना,नौदल, वायुदलामधून 5वर्षाच्या आत सेवा निवृत्ती घेतलेले जे.सी.ओ. आणि जवान किंवा महाराष्ट्र वन विभागातून सेवा निवृत्ती घेतलेल्या महिला.
          वयोमर्यादा - माजी जे.सी.ओ.साठी 48 वर्षे, माजी एन.सी.ओ. / जवान 42 वर्षे, महाराष्ट्र वन विभागामधून सेवानिवृत्ती घेतलेल्या महिलांसाठी वयाची अट नाही. उमेदवार शारीरिकदृष्ट्या शेप-1 आणि उत्तम चारित्र्य असणे आवश्यक आहे.
          सेवा निवृत्तीवेळी उमेदवार ज्या पदावर होता त्या पदावरच त्यांची भरती करण्यात येईल. सेवा निवृत्त जे.सी.ओं. ची नायब सुभेदार पदावर भरती करण्यात येईल. भरती झाल्यानंतर जर त्यांचे काम व्यवस्थित नसेल तर त्यांना ऑर्डरव्दारे सेवा मुक्त करण्यात येईल. अर्जदारावर कोणताही गुन्हा, पोलीस तक्रार असता कामा नये किंवा कोणत्याही न्यायालयात खटला चालू असता कामा नये. एकापेक्षा जास्त विवाह करणाऱ्या व्यक्तीचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. यामध्ये भरती झालेल्या उमेदवारांना निवृत्ती वेतन लागू नाही. भरतीनंतर जे.सी.ओ. 55 वर्षापर्यंत व जवान 50 वर्षापर्यंत काम करू शकतात.
          शारीरिक पात्रता : उंची 160 सेंमी, वजन 50 किलो, छाती 82 सेंमी
          शारीरिक योग्यता : 7 मिनीटे 9 सेंकदामध्ये 1 मील पळणे, 9 फूट लांब उडी, उंचावर चालण्याची क्षमता, योग्य उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. अधिक माहितीसाठी 9797707530, 09596251251 व 0240-2370195 या क्रमांकावर संपर्क साधावा.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.