कोल्हापूर, दि. 12 (जि.मा.का.) : मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्याव्दारे दिनांक
20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरलचे कार्यालय, मुंबई येथे
टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी/ कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी 46 वी पेंशन
अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून
निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे, टपाल विभाग महाराष्ट्र आणि
गोवा राज्यांचे निवृत्तीधारक ज्यांचे 3 महिन्याच्या आत निपटारा झालेला नाही अशा प्रकरणांचा
डाक पेंशन अदालतमध्ये विचार केला जाईल.
पेंशन अदालतमध्ये नितिगत प्रकरण अर्थांत उत्तराधिकार इत्यादी प्रपत्रामध्ये
आपले अर्ज श्री. एस. यु. पानतावणे, वरिष्ठ लेखा अधिकारी/ सचिव पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर
जनरलचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुंबई येथे दि.
10 जानेवारी 2020 पर्यंत किंवा यापूर्वी पाठवू शकता. त्यानंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन
अदालतीमध्ये विचार करण्यात येणार नाही.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.