बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

राजर्षी शाहू छत्रपती व आचार्य अत्रे पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण



कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.) : जिल्हा परिषदेच्यावतीने उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व कर्मचारी यांना दिला जाणारा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार व आचार्य अत्रे सर्वोकृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसुळ यांनी दिली.
       कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.