कोल्हापूर,दि. 6 (जि.मा.का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरीनिर्वाण दिनानिमित्त महापौर सूरमंजिरी
लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बिंदू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, समाजकल्याणचे
वरिष्ठ निरीक्षक संजय पवार, बाळासाहेब भोसले, तकदीर कांबळे, सुभाष देसाई, संग्राम यादव,
गौतम करूणादित्य, कादरभाई मलबारी, आदिल फरास, गनीभाई आजरेकर, चंद्रकांत माने, डॉ. महेंद्र
कानडे, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
या ठिकाणी प्रशांत आंबी, निलेश बनसोडे यांनी ज्ञानवंदना हा उपक्रम
सुरू केला होता. एक पेन एक वही या उपक्रमांतर्गत
स्वीकरली जाते. गोळा झालेल्या वह्या आणि पेन गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते.
गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी
व्हावे, असे आवाहन महापौर श्रीमती लाटकर यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी यांचा सत्कार
शाहूवाडी तालुक्यातील मौजे मरळे
येथील 35 मागासवर्गीय कुटुंबांना त्यांच्या वहिवाटीस व प्रत्यक्ष ताब्यात असलेली जमीन
कायम मालकी हक्काने देण्याचा निर्णय काल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला. या आदेशावर
रात्री उशिरा थांबून जिल्हाधिकाऱ्यांनी सही केली. 1948 पासून प्रतिक्षा असलेल्या या
प्रकरणाबाबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला
हा निर्णय घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. देसाई यांचा पुष्पगुच्छ देवून महापौर श्रीमती
लाटकर यांनी सत्कार केला.
या प्रसंगी युवक, महिला, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.